पुणे पोलिसांची कारवाई; बनावट जामीदारांच्या टोळीचा पर्दाफाश, दहाजणांना अटक

| Updated on: Nov 13, 2021 | 3:30 PM

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुण्यातील विविध न्यायालयात या बनावट जामीनदारांचे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधार गुप्ता यांनी गुन्हे शाखेची मदत घेतली. गुन्हेशाखेतील पोलिसांची टीम तयार केली. त्या टीमचे विभाजन केले.

पुणे पोलिसांची कारवाई; बनावट जामीदारांच्या टोळीचा पर्दाफाश, दहाजणांना अटक
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

पुणे – शहरातील न्यायालय परिसरात कार्यरत असलेल्या बनावट जामीनदाराच्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकांनी सापळा रचून ही करवाई केली आहे. शिवाजीनगर न्यायालाय व खडकी न्यायालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल १० जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गोपाळ कांगणे (३३) , सागर काटे (२५), इनकर कांबळे (३८), हसन शेख (२५) रोहित पुटगे (२४), किरण सूर्यवंशी (२७), रवी वाघमारे (२९) यांना शिवाजीनगर न्यायालय परिसरातून अटक केली. तर खडकी न्यायालयाच्या परिसरातून आरोपी मंगेश महादेव लोंढे (३१) सोनू हरी शिंदे (२०) सलीम शेख (२७) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

असा रचला सापळा
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुण्यातील विविध न्यायालयात या बनावट जामीनदारांचे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुप्ता यांनी गुन्हे शाखेची मदत घेतली. गुन्हे शाखेतील पोलिसांची टीम तयार केली. त्या टीमचे विभाजन केले. नियोजनाप्रमाणे या टीममधील पोलीस साध्या वेशात पोलिस वेगवेगळ्या न्यायालयाच्या आवरात थांबले. त्यानंतर सहाजिकच आवारात कार्यरत असलेल्या बनावट जामीनदाराच्या टोळीला याची माहिती नव्हती. त्यानंतर टीपनुसार एकाच वेळी माहिती देण्यात आलेले आरोपी त्या ठिकाणी उपस्थित होते. ही वेळा साधता पोलिसांनी त्यांना या पकडत कागद पत्राची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी दाखवलेल्या कागद पत्राची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे आढळून आले. कारवाई वेळी पोलिसांनी बनावट आधारकार्ड , रेशनकार्ड , सातबारा जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे व गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक निरीक्षक विनायक गायकवाड, सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप पोलीस आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे शाखा-२ चे सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेतील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक भोसले, विवेक पाडवी, पोलीस उप निरीक्षक खडके, शेडगे, जाधव, संजय गायकवाड, गुंगा जगताप, टेंगले, काळे, पोलीस अंमलदार मनोज साळुंके, संदीप जाधव, राहुल जोशी, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विश्वनाथ घोणे, गणेश लोखंडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा

आता माघार नाही; पिंपरीत ६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Corona Patients increasing | पुणेकरांनो काळजी घ्या ; दिवाळीनंतर वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठयांचे पद रद्द करा ; राज्य महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र