VIDEO | पिंपरी चिंचवडमध्ये बर्निंग बसचा थरार, 20-25 प्रवाशांसह जाणारी बस रस्त्यात पेटली

| Updated on: Oct 27, 2021 | 3:15 PM

पीएमपीएमएलची बस पुण्याहून दापोडीला येत होती. त्यात वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते, मात्र प्रसंगावधान दाखवत चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

VIDEO | पिंपरी चिंचवडमध्ये बर्निंग बसचा थरार, 20-25 प्रवाशांसह जाणारी बस रस्त्यात पेटली
पिंपरी चिंचवडमध्ये बस पेटली
Follow us on

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार पहायला मिळाला. दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने चालकाने प्रवाशांना वेळीच बसमधून उतरवल्यामुळे या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

जीवितहानी टळली

पीएमपीएमएलची बस पुण्याहून दापोडीला येत होती. त्यात वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते, मात्र प्रसंगावधान दाखवत चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुळा नदीच्या पुलावर बस पेटली

दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर असताना आधी इंजिनमधून धूर येताना दिसला, त्यामुळे बस ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना बसमधून तात्काळ खाली उतरवले. त्यानंतर बसने पेट घेतला. आग भडकल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

बसमधील आगीवर नियंत्रण

ही बस सीएनजीवर चालणारी असल्याने गॅसच्या टाकीपर्यंत आग पोहचू न देण्याचं आव्हान जवानांसमोर होतं. त्यात त्यांना यश मिळालं आणि आग आटोक्यात आली.

पाहा व्हिडीओ :

मुंबईत तेजस्विनी बसला अपघात

दुसरीकडे, मुंबईतील दादर परिसरात बेस्टच्या तेजस्विनी बसला भीषण अपघात (Tejaswini Bus Accident) झाला. बस क्रमांक 22  बसने ट्रकला मागील बाजूने धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | तेजस्विनी बसची ट्रकला धडक, दादरमधील भीषण अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत कैद

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ