दारुच्या दुकानाचा परवाना देण्याचा बहाणा, पुण्यातील दाम्पत्याकडून व्यावसायिकाला 60 लाखांचा गंडा

दारुच्या दुकानाचा परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने एका बिझनेसमनची 60 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी महिलेसह दोघा जाणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दारुच्या दुकानाचा परवाना देण्याचा बहाणा, पुण्यातील दाम्पत्याकडून व्यावसायिकाला 60 लाखांचा गंडा
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 6:50 AM

पुणे : दारुच्या दुकानाचा परवाना देण्याचा बहाणा करुन एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी तब्बल साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातून ही घटना समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

दारुच्या दुकानाचा परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने एका बिझनेसमनची 60 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी महिलेसह दोघा जाणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजित अरविंद लोहार (रा. माळीनगर, माळशिरस, सोलापूर) यांनी या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

दाम्पत्यावर याआधीही गुन्हा

शुभम दुर्गेश गौर आणि त्याची पत्नी रंजना गौर उर्फ रंजना उपदेशे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. दोघांच्या विरुद्धही यापूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातसुद्धा गुन्हा दाखल आहे. दोघांनाही यापूर्वीच शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती.

संबंधित बातम्या :

परभणीत कर्ज आणि नापिकीला कंटाळून पत्नीची हत्या आणि पतीची आत्महत्या

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात; डॉक्टरसह दोघांना अटक

माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण