VIDEO | पुण्यात कर्मचाऱ्याने बॉसची महागडी बाईक भररस्त्यात जाळली, टोकाच्या रागाचं कारण काय?

| Updated on: Oct 04, 2021 | 9:51 AM

अंकित यादव हा मालक गणेश उंदरे पाटील यांच्याकडे सिमेंट ब्लॉक बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. पगार मिळाला नाही, म्हणून दारुच्या नशेत त्याने पाटलांची गाडी पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

VIDEO | पुण्यात कर्मचाऱ्याने बॉसची महागडी बाईक भररस्त्यात जाळली, टोकाच्या रागाचं कारण काय?
पुण्यात कर्मचाऱ्याने मालकाची बाईक जाळली
Follow us on

पिंपरी चिंचवड : बॉसचा राग आला, तर एखादा कर्मचारी काय करु शकतो? ऑफिसला दांडी मारणं, कामात मुद्दाम चुका करणं, वरिष्ठांकडे त्याची तक्रार करणं, पण पुण्यातील कर्मचाऱ्याने बॉसवरचा राग त्याच्या दुचाकीवर काढला. कर्मचाऱ्याने बॉसची महागडी बाईक भररस्त्यात जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोकाच्या रागाचं कारणही स्पष्ट झालं आहे.

काय आहे कारण

मालकाने पगाराचे 40 हजार रुपये दिले नाहीत, म्हणून कामगाराने मालकाची दुचाकी जाळल्याची घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी कर्मचारी अंकित यादव याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

दारुच्या नशेत गाडी पेटवली

अंकित यादव हा मालक गणेश उंदरे पाटील यांच्याकडे सिमेंट ब्लॉक बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. पगार मिळाला नाही, म्हणून दारुच्या नशेत त्याने पाटलांची गाडी पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

दुसरीकडे, अंमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून जास्त हिस्सा घेतल्याने बॉसची हत्या करण्यात आल्याची घटना काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत उघडकीस आली होती. तिघांनी आपल्या बॉसला घरात घुसून रॉडने मारुन संपवलं होतं. नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली होती. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिघांनी पोलिसांना काय सांगायचं, याबद्दल एका मैदानात बसून योजना आखली होती.

मयत तरुणाविरुद्ध 15 गुन्हे दाखल

तिघेही आरोपी पोलिसांना तब्बल 8 तास उलटसुलट जबाब देत होते. मात्र सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या. हत्या करण्यात आलेल्या जेकब क्रिस्तोपा याच्या विरोधातही विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल होते.

बॉसच्या हत्येचा कट

अंमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून मिळणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा तिघांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम जेकब क्रिस्तोपा स्वतःला ठेवायचा. परंतु आपल्यापेक्षा जेकब यालाच अधिक नफा मिळतो, ही गोष्ट तिघांनाही खटकत होती. त्यामुळे तिघांनी आपला बॉस जेकबला मारण्यासाठी कट रचला होता.

घरात लोखंडी रॉडने मारुन हत्या

बॉसच्या घरामध्ये जाऊन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्या करून तिघे जण पसार झाले होते. हत्या झालेली व्यक्ती सराईत गुन्हेगार असून त्याच्या तीन साथीदारांनी त्याची हत्या केल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला. त्यामुळे अवघ्या 12 तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली.

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत तिघांनी बॉसला घरात घुसून संपवलं, मैदानात बसून खोट्या जबानीचंही प्लॅनिंग

नव्या इमारतीत झोपलेल्या दोघा मजुरांची हत्या, आरोपी मजूर पसार

पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी भोवली, पोलिसाकडून सासऱ्यांची गोळी झाडून हत्या