गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे, पुण्यात दोन ठिकाणी कारवाई, तिघांना अटक

| Updated on: Oct 03, 2021 | 8:33 AM

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन ठिकाणी वेगवेगळ्या कारवाया करत गुन्हे शाखेने एकूण तीन आरोपींना जेरबंद केले.

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे, पुण्यात दोन ठिकाणी कारवाई, तिघांना अटक
पुण्यात जिवंत काडतुसांसह पिस्तुल जप्त, तिघांना अटक
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन ठिकाणी वेगवेगळ्या कारवाया करत गुन्हे शाखेने एकूण तीन आरोपींना जेरबंद केले.

काय आहे प्रकरण?

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मावळमध्ये कारवाई करत मदन वारंगे आणि सागर भिलारे या दोन आरोपींना अटक करत आरोपींकडून एका गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे असा 81 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

दुसरीकडे, पुणे ग्रामीण पोलीसांच्याच स्थानिक गुन्हे शाखेने दुसरी कारवाई खेड-मंचर परिसरात करत दीपक बागडे या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी एक गावठी बनावटीच्या पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहेत.

पिस्तूल-तलवारीच्या धाकाने लूटमार

याआधी, गावठी पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी पुणे पोलिसांनी गजाआड केली आहे. पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखाने या टोळीला जेरबंद केलंय.

पुणे सातारा महामार्गावरील वरवे गावातील भंगार व्यावसायिक कुरबान इन्सान अली यांच्या घरावर दरोडा टाकून लूटमार करून ही टोळी पळाली होते. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी काही तासात गुन्हेगारांना मुद्देमालासह चार जणांना पकडले आहे. सापळा रचून या टोळीला अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांकडून आरोपींना बेड्या

पोलिसांनी माहिती दिली की, “आपण आता 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 14 तारखेला रात्री 2 वाजता भंगारवाल्याला रिव्हॉल्ववरचा धाक दाखवून 35 हजार रुपये या टोळीने लुटले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत तसंच आणखी काही माध्यमातून चोरट्यांना अटक केलीय. राजगडच्या हद्दीतच आरोपी लपून बसले असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे जाऊन त्यांना पकडलं.त्यावेळी 1 वेपन, चोरीस गेलेला मोबाईल, तलवारी, असा ऐवज जप्त केला”

आरोपींच्या मेडिकल टेस्ट करुन पुढील कारवाईसाठी राडगड पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. सर्वसाधारणपणे हे आरोपी मजूर वर्गातले आहेत. त्यांना पैशांची गरज असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून चोरी करत असल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या :

गावठी पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी गजाआड, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मुंबईत विकायला आणल्या, मध्यप्रदेशच्या तस्करांना मुंबई पोलिसांनी घेरलं आणि…