पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मुंबईत विकायला आणल्या, मध्यप्रदेशच्या तस्करांना मुंबई पोलिसांनी घेरलं आणि…

मुंबई पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मध्यप्रदेशातून बनावट पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन मुंबईत दाखल झालेल्या इसमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मुंबईत विकायला आणल्या, मध्यप्रदेशच्या तस्करांना मुंबई पोलिसांनी घेरलं आणि...

मुंबई : मुंबई पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मध्यप्रदेशातून बनावट पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन मुंबईत दाखल झालेल्या इसमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी हे मुंबईत पिस्तूल विकण्यासाठी आले होते. त्यातून त्यांना चिक्कार पैसे मिळणार होते. पण पोलिसांनी योग्यवेळी सापळा रचत आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी हे मध्यप्रदेशातून आले आहेत. ते मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून 8 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे घेऊन आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडील सर्व शस्त्रसाठा जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

मध्यप्रदेशातील खरगोन या जिल्ह्यातून काही आरोपी पिस्तूलाच्या अवैध विक्रीसाठी मुंबईत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी विक्रोळीत सापळा रचला. यादरम्यान दोन आरोपी संशयित आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांच्याजवळ आठ पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्याकडूल शस्त्रास्त्रे जप्त केले.

पोलिसांचा तपास सुरु

या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. आरोपी नेमकं कुणाच्या सांगण्यावरुन मुंबईत पिस्तूल घेऊन आले, ते पिस्तूल नेमकं कुणाला देणार होते किंवा त्यांनी कुणाकडून पिस्तूल घेतल्या? याचा सविस्तर तपास सध्या सुरु आहे. तसेच या टोळीचे पायमुळे राजस्थानमध्ये घट्ट रोवल्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे देखील तपास केला जाणार आहे. तपासातून सर्व गोष्टी समोर येईल. त्यामुळे अजून तपास सुरु आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांनी दिली आहे.

धुळ्यातही पोलिसांनी मध्यप्रदेशातील पिस्तूल तस्करांना बेड्या ठोकल्या

काही दिवसांपूर्वी धुळ्यातही पोलिसांनी मध्यप्रदेशातून पिस्तूलची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. मध्यप्रदेशातून अवैधपणे गावठी कट्टे (पिस्तूल) खरेदी करुन राजस्थानात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं होतं. धुळे पोलिसांनी शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे गावाजवळ आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून 3 पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.

पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून आरोपींच्या गैरकृत्याबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांना चोपडा येथून दोन इसम JJ 08 BB 5069 या नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीतून अवैधरित्या अग्निशस्त्र घेऊन दोंडायचा मार्गाने राजस्थानकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. संबंधित माहिती शंभर टक्के खरी असल्याची खात्री करण्यात आलेली होती. त्यामुळे पोलिसांनी शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीतील चिलाणे गावाजवळ सापळा रचला. त्यानंतर स्कॉर्पिओ आल्यानंतर तिचा पाठलाग करत आरोपींना बेड्या ठोकल्या.

हेही वाचा :

पेटवून घेऊन जळत्या अंगाने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धाव, पुण्यातील थरार

तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI