VIDEO : तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाण

तृतीयपंथींयांच्या दादागिरीच्या घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. नाशिकमध्ये काल (17 ऑगस्ट) टोलनाक्यावर पैसे दिले नाही म्हणून प्रवाशांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तशीच काहिशी घटना समोर आली आहे.

VIDEO : तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाण
तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाण

नागपूर : तृतीयपंथींयांच्या दादागिरीच्या घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. नाशिकमध्ये काल (17 ऑगस्ट) टोलनाक्यावर पैसे दिले नाही म्हणून प्रवाशांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर नागपुरातही तसाच काहिसा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यावेळी तृतीयपंथीयांनी थेट घरात शिरुन घरातील दोन सदस्यांना मारहाण केली. तसेच घरातील टीव्ही, फ्रीज सारख्या अमूल्य वस्तूंची देखील तोडफोड केली.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही नागपुरच्या हिंगणा परिसरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलडोह परिसरात घडली. तृतीयपंथी घरोघरी पैसे मागत होते. यावेळी एका व्यक्तीने पैसे दिले नाहीत. त्यावरुन तृतीयपंथीयांनी हुज्जत घातली. यावरुन तृतीयपंथीयांच्या टोळीने त्या घरात शिरुन घरातील सगळी मौल्यवान वस्तूंची तोडफोड केली. तृतीयपंथीयांनी अंकुश हरिभाऊ मुनेश्वर आणि त्यांची आई घरात असताना सामानाची नासधूस केली.

घरातील टीव्ही, फ्रीज आणि इतर वस्तूंची तोडफोड

श्रावण महिना असल्याचे निमित्त सांगून तीन-चार तृतीयपंथीयांनी वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. यावेळी अंकुश यांच्या घरी तृतीयपंथी आल्यानंतर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. अंकुश यांनी त्यांना वर्गणी दिली नाही. त्यावरुन वाद निर्माण झाला. पण हा विषय काल संपला असताना काही तृतीयपंथी आज ऑटोरिक्षाने अंकुशच्या घरी दाखल झाले आणि शिवीगाळ करत घरात घुसले. त्यांनी अंकुशच्या घरातील टिव्ही, फ्रीज आणि इतर वस्तूंची तोडफोड केली.

पोलिसात गुन्हा दाखल

तृतीयपंथी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी अंकुश आणि त्यांच्या आईलासुद्धा मारहाण केली. हा सगळा गोंधळ पाहून गावकरी जमा झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या सर्व तृतीयपंथींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

तृतीयपंथींनी कशाप्रकारे नासधुस केलीय ते या व्हिडीओतून बघा :

हेही वाचा :

पेटवून घेऊन जळत्या अंगाने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धाव, पुण्यातील थरार

VIDEO : नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा, टोलनाक्यावर प्रवाशांना शिवीगाळ-बाचाबाची, नंतर मारहाण, तुफान हाणामारीचा व्हिडीओ समोर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI