पुण्यात दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं

Women Suicide | कविता भोसले यांना प्रसन्नराज हा दोन वर्षांचा लहान मुलगा होता. काही वैयक्तिक कारणामुळे कविता भोसले यांनी दोन वर्षांच्या प्रसन्नराजला घेऊन विहिरीत उडी मारली आणि आयुष्य संपवले.

पुण्यात दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 10:20 AM

पुणे: पुण्यात एका आईने आपल्या चिमुरड्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यालगत असणाऱ्या म्हातोबाची आळंदी परिसरात हा प्रकार घडला. (Women suicide with her children in Pune)

प्राथमिक माहितीनुसार, मयत महिलेचे नाव कविता देवीदास भोसले (वय ३०, सध्या रा. भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे आहे. कविता भोसले यांना प्रसन्नराज हा दोन वर्षांचा लहान मुलगा होता. काही वैयक्तिक कारणामुळे कविता भोसले यांनी दोन वर्षांच्या प्रसन्नराजला घेऊन विहिरीत उडी मारली आणि आयुष्य संपवले. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दोघांच्या मृत्यमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या महिलेच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेतकरी महिलेचं टोकाचं पाऊल

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका शेतकरी महिलेने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं. अनेकांची शेती वाहून गेली. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

याच नैराश्यातून नाशिकमधील शेतकरी महिलेने आत्महत्या केली होती. पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे हवालदिल होऊन शेतकरी महिलेने विष प्राशन केले. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. ही नांदगावच्या न्यायडोंगरी येथे घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं आवाहन केलं आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशीच दुर्दैवी घटना घडल्यामुळे नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या:

अतिवृष्टीमुळे डोळ्यांदेखत शेती उद्ध्वस्त, सारं वाहून गेलं, डोक्यावर कर्जाचा डोंगर, शेतकरी महिलेचं टोकाचं पाऊल

…आणि चार मित्र पुराच्या चक्रव्यूव्हात अडकले, जल्लोषाचं संकटात रुपांतर, गोंदियातील मन पिळवटून टाकणारी घटना

बाप्पाच्या आगमनादिवशीही प्रेमाचा खूनी खेळ, आणि त्यानं बघता बघता तिच्यासमोर डोक्यात गोळी घातली

(Women suicide with her children in Pune)