AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप्पाच्या आगमनादिवशीही प्रेमाचा खूनी खेळ, आणि त्यानं बघता बघता तिच्यासमोर डोक्यात गोळी घातली

त्या पीडीत मुलीचं लग्न होईल की नाही याबाबतच आता साशंकता आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणात गावकरी मात्र मुलीच्या बाजूनं उभे आहेत. त्यांच्यानुसार साजन हा सरफिरा होता आणि त्याला अनेक वेळा समजवून सांगूनही तो ऐकत नव्हता.

बाप्पाच्या आगमनादिवशीही प्रेमाचा खूनी खेळ, आणि त्यानं बघता बघता तिच्यासमोर डोक्यात गोळी घातली
फक्त वीस रुपयांसाठी केला खून.
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 2:25 PM
Share

सगळीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे पण तरीही काहींच्या आयुष्यातलं प्रेमाचं विघ्न काही कमी होताना दिसत नाहीय. त्यातच हा प्रेमाचा ज्वर एवढा चढला की एकानं प्रेमाच्या लफड्यातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. मुलीनं मात्र ह्या सनकी आशिकवर आपलं कधीच प्रेम नव्हतं असं म्हटलंय. तो लग्नासाठी जिद्द करत होता आणि ऐकायलाच तयार नव्हता, त्यातच त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. मुलाच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केलाय तर खुद्द मुलीचे कुटुंबिय मात्र भीतीत आहेत. एकीकडे मुलीचा संसार सुरु होण्याआधीच उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर आणि मुलीवर गंभीर आरोप झालेत.

नेमकी घटना कशी घडली? ही घटना आहे बिहारमधल्या बेगुसरायची. बासुदेवपूर चंदपूरा गावात साजनकुमार महतो नावाचा तरुण रहात होता. तो शेजारीच रहाणाऱ्या मुलीवर प्रेम करत होता. साजनला त्या मुलीशी लग्न करायचं होतं. त्यासाठी त्यानं काही वेळेस तिला प्रपोजही केलं पण मुलीनं काही त्याला दाद दिली नाही. त्यातच त्या मुलीचं दुसरीकडे लग्न ठरलं. त्याचा राग साजनच्या डोक्यात गेला. तो तशाच संतापात मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरात गेला. मुलीला घेऊन तो घराच्या बाहेर आला. साजन मुलीवर संतापलेला होता. मुलगी त्याला समजून सांगत होती. पण वाद बोलता बोलता टोकाला गेला. त्यानं त्याच रागाच्या भरात स्वत: जवळचा देसी कट्टा काढला आणि त्यातून स्वत: डोक्यात डोळी घातली. एका क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. जाग्यावर त्याचा जीव गेला.

हत्या की आत्महत्या? साजनकुमारच्या घरच्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप मुलींच्या कुटूंबियांवर केलाय तर त्यानं आत्महत्याच केली असं पोलीसांच्या प्राथमिक रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलंय. ह्या सगळ्या प्रकरणामुळे ती मुलगी मात्र पीडीत ठरलीय. कारण साजनन आत्महत्या केल्यामुळे मुलीच्या होणाऱ्या सासरवाल्यांनी तिच्यावर आताच संशय घ्यायला सुरुवात केलीय. त्या पीडीत मुलीचं लग्न होईल की नाही याबाबतच आता साशंकता आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणात गावकरी मात्र मुलीच्या बाजूनं उभे आहेत. त्यांच्यानुसार साजन हा सरफिरा होता आणि त्याला अनेक वेळा समजवून सांगूनही तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्यानं जे टोकाचं पाऊल उचललं त्याचा फटका मुलीच्या आयुष्याला नको.

विशेष म्हणजे बेगुसरायमध्येच 26 ऑगस्टला एका मुलगा बेपत्ता झाला. नंतर त्याचा मृतदेह पाटना जिल्ह्यातल्या मोकामा टाल भागात सापडला. त्याचं नाव ऋतूराजकुमार होतं. तो शाळेत शिकायचा. नेहमीप्रमाणं तो घराच्याबाहेर पडला आणि परतलाच नाही. तो ज्या सायकलवर जायचा तीही मिळाली नाही. नंतर त्याचं अपह्रण झालं असावं अशी शंका व्यक्त केली गेली. ती खरी ठरली. ऋतूराजचं अपह्रण करुन खून करण्यात आला. बेगुसरायमध्ये घडलेल्या ह्या लागोपाठच्या दोन घटनांनी दहशत निर्माण झालीय.

  PI संजय निकम यांची दादागिरी, लालबागच्या दरबारात म्हणतात, हात काय, पाय सुद्धा लावून दाखवतो!

केतकी चितळेला ‘ती’ पोस्ट आणखी भोवणार! ठाणे कोर्टाकडून अभिनेत्रीचा अटकपूर्व जामीन नामंजूर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Gold Price Today: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.