साबळेवाडीच्या माजी संरपंचाला पोलिसांचा दणका, पावणे चार कोटींच्या 38 गाड्या मूळ मालकांना परत

| Updated on: Nov 24, 2021 | 9:50 AM

खेड तालुक्यातील साबळेवाडीच्या माजी सरपंच सागर साबळे याला भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) अटक केली होती. या माजी सरपंचाकडून पोलिसांनी तीन कोटी 90 लाख रुपये किमतीच्या 38 कार जप्त केल्या होत्या. आता या कार मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत.

साबळेवाडीच्या माजी संरपंचाला पोलिसांचा दणका, पावणे चार कोटींच्या 38 गाड्या मूळ मालकांना परत
Bhosari Police
Follow us on

पिंपरी-चिंचवड : खेड तालुक्यातील साबळेवाडीच्या माजी सरपंच सागर साबळे याला भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) अटक केली होती. या माजी सरपंचाकडून पोलिसांनी तीन कोटी 90 लाख रुपये किमतीच्या 38 कार जप्त केल्या होत्या. आता या कार मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत.

साबळे हा नागरिकांकडून गाड्या भाड्याने घ्यायचा, त्याबाबत कायदेशीर अॅग्रीमेंट देखील तयार करायचा. काही दिवस भाडे देऊन नंतर भाडे थकावून त्या गाड्यांची कमी किमतीत विक्री करायचा. हा फॉर्म्युला वापरून साबळे याने अनेकांना गंडा घातला होता.

नेमकं काय घडलं होतं?

खेड तालुक्यातील साबळेवाडीच्या माजी सरपंचाला भोसरी पोलिसांनी अटक केली होती. या माजी सरपंचाकडून पोलिसांनी तीन कोटी 90 लाख रुपये किमतीच्या 38 कार जप्त केल्या होता. माजी सरपंच सागर मोहन साबळे (वय 34) याला पोलिसांनी अटक केली होती साबळे हा नागरिकांकडून गाड्या भाड्याने घ्यायचा, त्याबाबत कायदेशीर अॅग्रीमेंट देखील तयार करायचा. काही दिवस भाडे देऊन नंतर भाडे थकावून त्या गाड्यांची कमी किमतीत विक्री करायचा.

हा फॉर्म्युला वापरुन साबळे याने अनेकांना गंडा घातला. पोलिसांनी तपासा दरम्यान ऑडी, फॉक्सवॅगन, टोयोटा इनोव्हा, महिन्द्रा, मारुती सुझुकी, टाटा, हयुदाई या सारख्या महागड्या कंपन्यांच्या एकूण 23 गाडया हस्तगत केल्या.

तसेच निलेश गोजालु (रा. कासारवाडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोसरी आणखी 15 महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. वरील दोन्ही गुन्ह्यात आरोपीला 15 दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी बीड, माजलगाव, औरंगाबाद तसेच पुणे याठिकाणावरून दोन्ही गुन्हयामध्ये तीन कोटी 90 लाखांच्या 38 कार जप्त केल्या.

जप्त केलेल्या वाहनांच्या मूळ मालकांना त्याच्या कार परत देण्यात आल्या. नागरिकांनी वाहने भाड्याने देताना तसेच वाहनांशी संबंधित कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्यावी. सर्व बाबींची खातरजमा करावी, असे आवाहन उपायुक्त मंचक इप्पर यांनी यावेळी बोलताना केले.

संबंधित बातम्या :

Kalyan Crime | कल्याणमध्ये विकृतीचा कळस, प्रियकर-प्रेयसीकडून अल्पवयीन भाऊ-बहिणीचा लैंगिक छळ

Bangalore Murder | लैंगिक अत्याचाराचा आरोप, अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मुलीने बापाला संपवलं