ओव्हरटेक करताना स्कूटर घसरली, पुण्यात 20 वर्षीय तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

कश्मिरा सुजय गार्डनहून काही कामानिमित्त लक्ष्मीनारायण चौकच्या दिशेने निघाली होती. ती स्कूटरने प्रवास करत होती. एका ट्रकला तिने डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बाजूला आधीच एक गाडी पार्क केलेली होती. त्यामुळे कश्मिराला अचानक ब्रेक लावावे लागले.

ओव्हरटेक करताना स्कूटर घसरली, पुण्यात 20 वर्षीय तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 1:57 PM

पुणे : कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडून युवा बॅडमिंटनपटूचा मृत्यू झाल्याची करुण घटना समोर आली आहे. पुण्यातील मुकुंदनगर भागात सुजय गार्डनच्या समोर बुधवारी सकाळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. ट्रकला ओव्हरटेक करताना डाव्या बाजूला एक गाडी पार्क केलेली असल्यामुळे 20 वर्षीय तरुणीला अचानक स्कूटरचे ब्रेक लावावे लागले. त्यामुळे दुचाकी घसरुन तरुणी ट्रकखाली चिरडली गेली.

20 वर्षीय बॅडमिंटनपटू कश्मिरा प्रशांत भंडारी हिचा अपघाती मृत्यू झाल्याचं वृत्त ‘टाईम्स नाऊ’ वेबसाईटने दिले आहे. कश्मिरा ही पुण्यातील नामवंत फटाके व्यापारी प्रशांत भंडारी यांची कन्या होती.

नेमकं काय घडलं?

कश्मिरा सुजय गार्डनहून काही कामानिमित्त लक्ष्मीनारायण चौकच्या दिशेने निघाली होती. ती स्कूटरने प्रवास करत होती. एका ट्रकला तिने डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बाजूला आधीच एक गाडी पार्क केलेली होती. त्यामुळे कश्मिराला अचानक ब्रेक लावावे लागले.

ट्रक चालकाचा शोध सुरु

ब्रेक दाबल्याने कश्मिराची स्कूटर घसरली आणि ती खाली पडली. त्याच वेळी ट्रक तिच्या अंगावरुन गेल्यामुळे ती चिरडली गेली, अशी माहिती एसीपी सुषमा चव्हाण यांनी दिल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनास्थळावरुन पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

निष्णात बॅडमिंटन खेळाडूचा अंत

ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर एफआयआर नोंदवला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. तरुणी डेक्कन जिमखाना परिसरातील एका कॉलेजमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा कोर्स करत होती. ती निष्णात बॅडमिंटन खेळाडू असून करिष्माने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

प्रॉपर्टी डीलरने दिली चहाची ऑफर, शिक्षिका बेशुद्ध पडल्यानंतर केले असे की…

शेतात नेऊन बायको-मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, वाचलेल्या लेकराने मामाला फोन केला आणि…

CCTV | रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण