शेतात नेऊन बायको-मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, वाचलेल्या लेकराने मामाला फोन केला आणि…

लातूर शहरातील नरसिंह नगरात राहणाऱ्या 38 वर्षीय पतीने व्यवसायात आलेल्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. जखमी असलेल्या मुलाला शुद्ध आल्यानंतर त्याने आपल्या मामाला मोबाईलवर फोन केला. भाच्याने मामाला घडलेली घटना सांगितल्यानंतर सर्वांना तातडीने लातूरच्या एमआयटी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

शेतात नेऊन बायको-मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, वाचलेल्या लेकराने मामाला फोन केला आणि...
लातूरमध्ये कौटुंबिक आत्महत्येचा प्रयत्न

लातूर : पत्नी आणि मुलांसह स्वतःचाही गळा चिरुन पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लातूर जिल्ह्यातील शेरा गावच्या शिवारात ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. 38 वर्षीय व्यावसायिकाने पत्नी आणि दोन मुलांना शिवारात नेऊन आधी विषारी औषध पाजलं. त्यानंतर गळ्यावर वार करुन त्यांचा जीव घेतला. त्याच पद्धतीने पतीने स्वतःचंही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण?

लातूर शहरातील नरसिंह नगरात राहणाऱ्या 38 वर्षीय पतीने व्यवसायात आलेल्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना रेणापूर रस्त्यावरच्या शेरा गावच्या शिवारात बाईकवरुन नेलं. तिथे तिघांना विषारी औषध पाजलं. इतक्यावर न थांबता ब्लेडने त्यांच्या गळ्यावर वारही केले. त्यानंतर स्वतःही विष घेऊन गळ्यावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

शुद्धीवर आल्याने मुलाचा मामाला फोन

चारही जण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडले होते. जखमी असलेल्या मुलाला शुद्ध आल्यानंतर त्याने आपल्या मामाला मोबाईलवर फोन केला. भाच्याने मामाला घडलेली घटना सांगितल्यानंतर सर्वांना तातडीने लातूरच्या एमआयटी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

व्यावसायिक कर्जातून टोकाचं पाऊल

पानपट्टी चालवून आणि थोडीफार असलेली शेती करून आपलं कुटुंब चालवणाऱ्या व्यावसायिकावर कर्ज झालं होतं. त्यामुळे ते स्वतःचं कुटुंब संपवायला निघाले होते, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. या घटनेत 38 वर्षीय पती, 34 वर्षीय पत्नी, 14 आणि 12 वर्षांची दोन मुलं जखमी झाली आहेत. रेणापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

CCTV | रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण

परजातीच्या प्रियकरामुळे अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट, आईला संताप अनावर, मुलाच्या मदतीने लेकीचा जीव घेतला

लग्नाआधीच आक्रित! नदीत सेल्फी घेताना मुंबईकर महिला बुडाल्या; सासूचा मृत्यू, होणाऱ्या सूनबाई बेपत्ता

Published On - 11:35 am, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI