AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: बाईकच्या धडकेत आजोबा 35 फूट लांब उडाले! मोरगावातील अपघाताचा 2.5 सेकंदांचा थरार, जागीच खल्लास

Puna Baramati Accident CCTV : बाईकच्या मागून येणाऱ्या एका काळ्या रंगाच्या कारलाही नेमकं काय झालं, हे कळायला मार्ग नसतो. पण या कारच्या समोरच दुचाकी आणि इसम कोसळतात.

Video: बाईकच्या धडकेत आजोबा 35 फूट लांब उडाले! मोरगावातील अपघाताचा 2.5 सेकंदांचा थरार, जागीच खल्लास
भीषण अपघातImage Credit source: Twitter
| Updated on: May 18, 2022 | 3:40 PM
Share

पुणे : बारामतीमधील (Baramati News) मोरगाव रस्त्यवार भीषण अपघात घडला. दुचाकीच्या (Bike Accident Video) धडकेत एका आजोबांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आजोबांना बसलेली बाईकची धडक इतकी भीषण होती की ते तब्बल 30 ते 35 फूट लांब फेकले गेले. दुचाकीनं त्यांनी अक्षरशः फरफटत नेलंय. रस्ता ओलांडत असताना बाईकने आजोबांना जोरदार धडक दिल्यानं या अपघात घडला. अपघाताचा हा थरार सीसीट्वीही (Accident CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झालाय. अंगावर काटा आणणारी ही घटना पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. अवघ्या अडीच सेकंदात काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेची दृश्य विचलीत करणारी आहेत. लष्कर बारमती मोरगाव रस्त्यावर हा अपघात कऱ्हावागज इथं घडला. या अपघातानंतर दुकाचीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेनं रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केलाय.

नेमकं दिसलं काय व्हिडीओमध्ये?

या अपघाताचा 30 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओ सुरुवातील एक दुचाकी जाताना दिसते. तर डाव्या बाजूला एक इसम रस्ता ओलांडण्यासाठी पुढे असल्याचं आढळतं.

सफेद कपड्यांमधला हा इसम रस्ता ओलांडण्याच्या हेतून पुढे येतो. तो चालत राहतो. आपल्या उजव्या बाजूला वळून पाहतानाच त्याला भरधाव दुचातीची जोरदार धडक बसते. ही धडक इतकी जबरदस्त असते ही या इसमाला बाईक फरफटत 30 फूट लांब घेऊन जाते. यानंतर इसम रस्त्यावर आदळला जातो. मार इतका भीषण असतो या व्यक्तीचा जागीच मृत्यू होता. या अपघातामुळे एकच खळबळ उडते.

पाहा अपघाताचा थरार :

बाईकच्या मागून येणाऱ्या एका काळ्या रंगाच्या कारलाही नेमकं काय झालं, हे कळायला मार्ग नसतो. पण या कारच्या समोरच दुचाकी आणि इसम कोसळतात. काही अंतरावर जाऊन काही थांबते आणि रस्त्याच्या एका बाजूला दुचाकीस्वार आणि ज्याला धडक बसते, तो इसम फेकला जातो.

रस्त्या शेजारच्या घराबाहेर असलेल्या काही व्यक्ती या अपघातानंतर रस्त्याच्या दिशेनं जाऊ लागतात, असंही व्हिडीओमध्ये दिसून आलंय. धक्कादायक बाब म्हणजे बारामतीमधील काही जणांना नुकताच यमुना एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झालेला होता. या अपघातात चार महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातातील मृतांमध्ये बारामतीमधील नागरिकांचा समावेश होता. अपघाताची ही घटना ताजी असतानाचा आता बारामतीमधील आणखी एक थरारक घटना समोर आली आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.