AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | एक कोटी रुपयांची खंडणी, ATMमधील कचऱ्याच्या डब्यात पैसे, पुढे असे घडले…

Pune Crime | पुणे शहरातील व्यावसायिकाकडून एक कोटी रुपयाची खंडणी मागितली. त्यासाठी त्याचे अपहरण करुन धमकवले. त्यानंतर पैसे देण्यासाठी सोडले आणि पैसे प्रत्यक्षात घेण्याऐवजी एटीएमच्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास लावले...

Pune Crime | एक कोटी रुपयांची खंडणी, ATMमधील कचऱ्याच्या डब्यात पैसे, पुढे असे घडले...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 02, 2023 | 8:54 AM
Share

रणजित जाधव, पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या खंडणी प्रकरणाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. व्यावसायिक संजय कुरुंदवाडे यांचे अपहरण करून त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना धमकावत एक कोटी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कुटुंबातील व्यक्तींचा गेम करू, अशी धमकी दिली. पैसे एटीएममधील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास लावले.

कसा झाला होता प्रकार

संजय कुरुंदवाडे यांचे 21 सप्टेंबर रोजी आळंदी फाटा येथून चाकणकडे जात असताना रात्री नऊ वाजता अपहरण झाले होते. त्यांच्या गाडीला रिक्षा आडवी लावली. पाच ते सहा जणांनी संजय यांना अडवून त्यांच्या गाडीची चावी आणि मोबाईल फोन हिसकवून घेतले. त्यांना त्या रिक्षेत जबरदस्तीने बसवून शिरोली येथील शेतात नेले. त्यांना शेतात डांबून ठेवले होते.

पैशांची केली मागणी

अपहरण करणाऱ्यांनी त्यांच्याकडून एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या घरच्यांनाही ठार करु, असे सांगत त्यांच्या बॅगमधील 20 हजार रुपये काढून घेतले. दोन दिवसांत 12 लाख रुपये दे असे सांगत संजय कुरुंदवाडे यांना सारा सिटी येथे दुचाकीवरून आणून सोडले. मग सतत फोन करून पैशांची मागणी कायम ठेवली.

एटीएम सेंटर मधील कचऱ्याच्या डब्यात पैसे

संजय कुरुंदवाडे यांनी पैसे देण्यास होकार दिल्यावर त्यांनी हे पैसे घेण्याऐवजी नाणेकरवाडी येथील हिताची कंपनीच्या एटीएम सेंटरमध्ये ठेवण्यास सांगितले. एटीएममधील कचऱ्याच्या डब्यात पैसे टाकण्याचे आरोपींनी सांगितले. हा प्रकार संजय कुरुंदवाडे यांनी पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवली. एटीएममध्ये पैसे घेण्यासाठी आरोपी येताच त्याला अटक केली. आकाश भुरे असे आरोपीचे नाव आहे. त्यानंतर त्याच्या चार साथीदार शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे, शुभम युवराज सरवदे, अजय नंदू होले, नवनाथ शांताराम बच्छे यांनाही अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

Follow Us
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा