AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ अन् वहिनीने मृतदेहाचे तुकडे करुन नदीत फेकले…पुण्यातील धक्कादायक घटनेचे कारण आले समोर

Crime News: सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती अशपाक याने शेजाऱ्यांना दिली. मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अशपाकची चौकशी केली. त्यातून या हत्येचा उलगडा झाला. पोलीसांनी सकिनाचा खून प्रकरणात अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केलीय.

भाऊ अन् वहिनीने मृतदेहाचे तुकडे करुन नदीत फेकले...पुण्यातील धक्कादायक घटनेचे कारण आले समोर
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 01, 2024 | 11:41 AM
Share

Pune Crime News: पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांच्या अनेक उपाययोजनेनंतर गुन्हेगारी कमी होत नाही. किरकोळ कारणांवरुन हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील नदीपात्रात मृतदेहाचे तुकडे मिळाले होते. त्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्या महिलेच्या भाऊ आणि वहिनीने तिची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करुन नदीला पूर आला असताना त्यात मृतदेह फेकून दिला. एका खोलीच्या मालकी वादातूनही ही हत्या झाली.

नदीत सापडला होता मृतदेह

पुण्यातील नदी पात्रात 26 ऑगस्ट रोजी मृतदेह सापडला होता. पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाणाच्या हद्दीत मुळा मुठा नदीमध्ये शीर, हात-पाय नसलेला मृतदेह आढळला होता. त्या सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा आहे. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून तिचा सख्खा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांनी तिची हत्या केली.

खोलीवरुन भाऊ अन् बहिणीत वाद

पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीवरुन भाऊ अन् बहिणीत वाद सुरु होता. या मालकीच्या वादातून ही हत्या झाली. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ अशपाक आणि वहिनी हमीदा तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र ती जात नसल्याने तिची हत्या करण्याचा डाव त्यांनी रचला. 26 ऑगस्ट रोजी पुण्यात पाऊस होता. नदीला पूर आले होते. मग घरातून धारदार शस्त्राने त्यांनी सकीनाची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह संगमवाडी येथील नदीपात्रात फेकून दिला.

असा उघड झाला प्रकार

सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती अशपाक याने शेजाऱ्यांना दिली. मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अशपाकची चौकशी केली. त्यातून या हत्येचा उलगडा झाला. पोलीसांनी सकिनाचा खून प्रकरणात अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केलीय.

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील