चक्क डॉक्टराचा तरुणावर कोयत्याने हल्ला, डॉक्टराकडून हल्ल्याचे कारण तरी काय?

pune doctor attacke: जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंडांनी कोयत्याने हल्ला केला आहे. या तिघांनी प्रितेश बाफना यांच्यावर हल्ला केला. डॉक्टर विवेक गुप्ता याच्याकडून पितेश बाफना यांनी व्याजाने घेतले होते. ते पैसे वेळेत परत न दिल्याने डॉक्टर विवेक गुप्ता आणि गुंडांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला.

चक्क डॉक्टराचा तरुणावर कोयत्याने हल्ला, डॉक्टराकडून हल्ल्याचे कारण तरी काय?
| Updated on: Jul 05, 2024 | 1:01 PM

पुणे शहरातील कोयता हल्ल्याचे प्रकार राज्यात चर्चेत असतात. पुण्यात किरकोळ कारणांवरुन कोयता हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडले आहे. कोयता घेऊन शहरात दहशत निर्माण करणारी टोळी पुणे शहरात आहे. त्यामुळे पुण्यातील कोयता गँगची चर्चा विधीमंडळात झाली. विरोधकांनी पुण्यातील कोयता गँगकडून वाढणारे हल्ले आणि निर्माण केली जाणाऱ्या दहशतीचा प्रकारावरुन सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर पुणे शहरातील कोयता हल्ल्याचे प्रकार कमी झाले नाही. आता चक्क एका डॉक्टराने कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ला प्रकरणाचा गुन्हा वाघोली येथील लोणीकंद पोलिसात दाखल झाला.

का केला कोयता हल्ला

जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंडांनी कोयत्याने हल्ला केला आहे. या तिघांनी प्रितेश बाफना यांच्यावर हल्ला केला. डॉक्टर विवेक गुप्ता याच्याकडून पितेश बाफना यांनी व्याजाने घेतले होते. ते पैसे वेळेत परत न दिल्याने डॉक्टर विवेक गुप्ता आणि गुंडांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रितेश बाफना जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील वाघोली येथील लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टराकडून हल्ला झाल्यामुळे…

डॉक्टर उच्चशिक्षित असतात. व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे जबाबदारी त्याच्यावर असते. त्यासाठी ते शपथ घेत असतात. परंतु उच्च शिक्षित डॉक्टरच जर एखाद्या गुंडासारखा व्यवहार करत असतील तर समाजव्यवस्थेला धक्का बसणार आहे. या प्रकारामुळे पुणे शहरात कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? पुणे पोलिसांची दहशत कायद्या मोडणाऱ्यांमध्ये राहिली नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पुण्यात दहशत निर्माण करण्याचा प्रकार

पुण्यात डॉक्टराने हल्ला केला असताना हडपसरमध्ये कोयते उगारुन दहशत निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसरमधील संकेत विहार सोसायटी परिसरात टोळक्याने दहशत निर्माण केली. वाहनांचा काचा फोडल्या. तसेच एका व्यक्तीवर कोयता उगारला. गुरुवारी घडलेल्या या प्रकारामुळे दहशत निर्माण झाली आहे.