AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक टँकर हलविण्यासाठी 36 तास ही नामुष्की, मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याची प्रतिक्रिया

"हा काळादिवस नाही, तर भगवादिवस आहे. यांनी मुंबईची वाट लावली होती. शिवसेना-भाजप महायुतीचा महापौर बसत आहे. यानंतर काही चौकशी होईल"

एक टँकर हलविण्यासाठी 36 तास ही नामुष्की, मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याची प्रतिक्रिया
Mumbai pune traffick jam
| Updated on: Feb 05, 2026 | 1:29 PM
Share

“उठावानंतर पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा कल शिवसेनेबरोबर आहे. महायुतीचे सरकार येईल” असं मंत्री संजय शिरसाट जिल्हा परीषद निवडणुकीवर म्हणाले. “राजकारणामध्ये अनेक उलथापालथ झाले आहेत. अजितदादाचे नाव घेऊन राजकारण सुरू आहे. अजितदादा यांच्या नावाने त्यांचे नाव घेऊन स्वतःच्या पक्षाला मतदान मागणे योग्य नाही. सुजाण मतदाराने योग्य उमेदवार निवडावा” असं रोहित पवारांच्या टि्वटवर शिरसाट म्हणाले.

“कालची घटना अत्यंत त्रासदायक आहे. असे घडेलच असे वाटले न्हवते. एक टँकर हलविण्यासाठी एवढा वेळ लागतो, ही नामुष्की आहे. 36 तास त्रास. ही गोष्ट ऐकून त्रास होतो” असं संजय शिरसाट मुंबई-पुणे महामार्गाच्या वाहतूक कोंडीवरुन होणाऱ्या आरोपांवर म्हणाले.

तेच फायनल राहील

“एमआयएम काहीही स्वप्न पाहत आहे. सपाटून मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कदाचित आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जे ठरवतील तेच फायनल राहील” असं शिरसाट यांनी सांगितलं. “अंजली दमानियाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांकडे द्यायला पाहिजे. कुणी केला, का केला? कसे केला? यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्या” असं संजय शिरसाट म्हणाले.

म्हणून त्यांच्यासाठी हा काळा दिवस

संजय राऊत म्हणाले की, मुंबईत भाजपचा महापौर होणं हा काळादिवस असेल. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. “हा काळादिवस नाही, तर भगवादिवस आहे. यांनी मुंबईची वाट लावली होती. शिवसेना-भाजप महायुतीचा महापौर बसत आहे. यानंतर काही चौकशी होईल आणि ज्यांनी चुकीचे केले ते जेलमध्ये जातील. म्हणून त्यांच्यासाठी हा काळा दिवस आहे” असं संजय शिरसाट म्हणाले.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.