पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 7 महिन्यात 840 महिला बेपत्ता! जूनची आकडेवारी चिंताजनक, सापडल्या किती? पाहा आकडेवारी

Pune Missing woman : महिला बेपत्ता होण्याची कारणं वेगवेगळी असल्याचंही समोर आलं आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 7 महिन्यात 840 महिला बेपत्ता! जूनची आकडेवारी चिंताजनक, सापडल्या किती? पाहा आकडेवारी
बेपत्ता महिलांची आकडेवारी
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 8:57 AM

पुणे : पुणे (Pune News) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बेपत्ता (Missing Woman in Pune) झालेल्या महिलांचा आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमध्ये नेमक्या किती महिला 2022 च्या पहिल्या सात महिन्यात बेपत्ता झाल्या, त्याचप्रमाणे त्यातल्या किती जणींचा पुन्हा शोध लागला, याची आकडेवारीही जारी करण्यात आली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे जून महिना सर्वाधिक चिंता वाढवणारा (Pune Missing Woman Data) ठरलाय. कारण एकट्या जून महिन्यात सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्या खालोखाल मे महिन्याचा नंबर लागतोय. चालू वर्षातील सात महिन्यात 840 महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी 396 महिला सापडल्या असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, जून महिन्यामध्ये 186 महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर मे महिन्यात 135 महिला बेपत्ता झाल्या होत्या. वेगवेगळ्या कारणांमुळे घर सोडणं, पळून जाणं अशा प्रकारांतून महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचंही समोर आलं आहे.

महिलांचा शोध घेण्यासाठी मुस्कान योजना

बेपत्ता झालेल्या महिलांचा शओोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम रावली होती. मुस्कान योजनेअंतर्गत या युवती आणि महिलांचा शोध घेण्यासाठी मोहीम पोलिसांनी राबवली होती. या योजनेतून बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांचा शोध सुरु करण्यात आला होता. या योजनेला काही प्रमाणत यशही आलं असल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. अजूनही ही योजना काम करते आहे. बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात या योजनेचा मोलाचा वाटा आहे.

का होतात महिला बेपत्ता?

महिला बेपत्ता होण्याची कारणे वेगवेगळी असल्याचंही समोर आलं आहे. मात्र त्यातील काही ठोस कारणं समोर आली आहे. महिला बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक वाद, नातेसंबंध, प्रियकराकडून लग्नाच्या बहाण्याने आमीष दाखवणे अशी अनेक कारणं पोलिसांच्या तपासासून समोर आलं आहे. चकीत करणारी बाब म्हणजे पोलिसांच्या माहितीनुसार महिलांचे अपहरण झाल्याची प्रकरणे फारच अल्प असल्याचंही वास्तव समोर आलंय.