AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime News | एटीएममधून अनेक वेळा चोरी, अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime News : चोरी करण्यासाठी चोरटे नवीन फंडे वापरत असतात. पुणे शहरात एटीएममधून गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्या होत होत्या. पोलिसांना चोरटे मिळत नव्हते. पोलिसांकडे तक्रारी वाढल्यानंतर या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. अखेर हे चोरटे पोलिसांच्या सापळ्यात आले.

Pune Crime News | एटीएममधून अनेक वेळा चोरी, अखेर पोलिसांच्या जाळ्यात
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे चोरटे वापरत असलेली प्लास्टीकची पट्टी दाखवताना. Image Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 07, 2023 | 3:23 PM
Share

अभिजित पोते, पुणे | 7 नोव्हेंबर 2023 : चोरटे चोरी करण्यासाठी अनेक नवनवीन फंडे वापरत असतात. आपण पोलिसांना सापडू नये, याची पूर्ण काळजी ते घेत असतात. परंतु कधीतरी त्यांच्याकडून चूक होते आणि ते पोलिसांच्या सापळ्यात येतात. पुणे शहरातील एटीएममधून चोऱ्या करणाऱ्या दोघांना पकडण्यात पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे चोरटे विविध भागांत जाऊन एटीएममधून चोऱ्या करत होते. पोलिसांकडून एटीएममधून चोरी झाल्याच्या तक्रारी वाढत गेल्या. अखेर या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्या सापळ्यात दोघे जण अडकले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी दोघांना पकडले

पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना उघड झाली. आरोपी उत्तर प्रदेशातील आहे. त्यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरु केली. त्यात त्यांनी शहरात अनेक ठिकाणी यापद्धतीने चोऱ्या केल्याचे सांगितले. तसेच उत्तर प्रदेशातही या चोऱ्या आम्ही करत होतो, हे त्यांनी सांगितले. अटक केली तेव्हा त्यांची ही या दिवस भरातील दुसरी चोरी होती. विश्रामबागपूर्वी त्यांनी शनिवार वाड्याजवळ असलेल्या एटीएममधून चोरी केली होती. दोघांकडून पुणे वाहतूक पोलिसांनी नऊ हजार पाचशे रुपयांची रक्कम देखील जप्त केली. ही कारवाई पुणे वाहतूक पोलिसांनी केली.

कशी करत होते चोरी

पुणे पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशातील आहे. हे दोन्ही जण एटीएममध्ये पैसे निघण्याच्या स्लॉटमध्ये एक प्लॅस्टीकची पट्टी लावत होते. ही पट्टी लावल्यानंतर एटीएममध्ये पिन टाकल्यावर पैसे मोजले जात होते. ते पैसे मशिनमधून बाहेर येत होते. परंतु या प्लास्टीकच्या पट्टीमुळे ते अडवले जात होते. ग्राहक बराच वेळ वाट पाहून पैसे निघून जात होता. ग्राहक निघाल्यावर हे दोघे एटीएममध्ये जाऊन ती प्लास्टीकची पट्टी काढून पैसे काढत होते. ग्राहकांच्या खात्यातून पैसे डेबिट होते होते, परंतु त्यांना ते मिळत नव्हते. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांनी सांगितले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?