AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vanraj Andekar Murder: मारा, मारा…सोडू नका… गॅलरीत उभी राहून वनराज आंदेकरच्या बहिणीची चिथावणी

Vanraj Andekar: पवन कतराल याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून गोळी झाडली. त्यानंतर समीर काळे यानेही फायरिंग केली. या वेळी वनराज आणि शिवम पळून जात होते. आरोपींनी वनराज यांना गाठले. त्याच्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले.

Vanraj Andekar Murder: मारा, मारा...सोडू नका... गॅलरीत उभी राहून वनराज आंदेकरच्या बहिणीची चिथावणी
Vanraj Andekar
| Updated on: Sep 03, 2024 | 11:29 AM
Share

पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला. हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात वनराज आंदेकर याची सख्खी बहीण आणि मेहुणे आहेत. हल्लेखोर वनराज आंदेकर याच्यावर हल्ला करत होते, त्यावेळी त्याची बहीण संजीवन गॅलरीत थांबली होती. गॅलरीतून ती हल्लेखोरांना चिथावणी देत होती. मारा, मारा…सोडू नका, असे चिथावणी तिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस ठाण्यात शिवीगाळ अन् धमकी

आरोपी संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांनी पोलिस ठाण्यात आकाश परदेशी याच्याशी वाद झाला. त्यावेळी पोलीस ठाण्यात शिवीगाळ केली. हा वाद सोडवण्यासाठी वनराज आंदेकर आणि त्याचा चुलत भाऊ शिवम यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी कोमकर यांनी वनराज आंदेकर याला धमकी दिली. तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितले आहे. आमच्या पोटावर पाय दिला आहे. तुला आज पोरं बोलावून ठोकणार…, असे सूर्यकांत आंदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अशी घडवली वनराज आंदेकराची हत्या

आरोपींनी कट रचून साथीदारांना नाना पेठेत बोलावले. रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी एका दुचाकीवरून तिघे जण आले. त्यानंतर आणखी काही जण आले. शिवम आणि वनराज यांच्या समोर आरोपी थांबले. मग पवन कतराल याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून गोळी झाडली. त्यानंतर समीर काळे यानेही फायरिंग केली. या वेळी वनराज आणि शिवम पळून जात होते. आरोपींनी वनराज यांना गाठले. त्याच्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले.

या लोकांवर गुन्हा दाखल

वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी सख्खी बहीण संजीवनी कोमकर आणि मेहुणा जयंत कोमकर, भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, अनिकेत दुधभाते, तुषार ऊर्फ आबा कदम, सागर पवार, पवन करताल, समीर ऊर्फ सॅम काळे यांच्यासह सुमारे पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वनराज आंदेकर याचे वडील सूर्यकांत आंदेकर यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.