AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१ ली ते ४ थी एकच शिक्षक, त्यात १० विद्यार्थी, नवीन शिक्षक आला, शाळा स्वच्छ केली, पण तो जीवन हरवून बसला..का?

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका शिक्षिकाने विद्यार्थ्यांना परिसरस स्वच्छ करण्यास सांगितले. परंतु विद्यार्थ्यांनी शाळाच बदलली. त्यानंतर शिक्षकाने तणनाशक आणले अन्...

१ ली ते ४ थी एकच शिक्षक, त्यात १० विद्यार्थी,  नवीन शिक्षक आला, शाळा स्वच्छ केली, पण तो जीवन हरवून बसला..का?
घुमा चित्रपटातील द्दश्य
| Updated on: Aug 10, 2023 | 4:45 PM
Share

पुणे | 10 ऑगस्ट 2023 : शाळेला शिक्षणाचे मंदिर म्हटले जाते. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची ही भावना असते. तशीच भावना समाजाची असते. पुणे जिल्ह्यातील शाळेत एका शिक्षकाने धक्कादायक प्रकार शाळेतच केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने केलेल्या या प्रकारामुळे गावच हादरले नाही तर सर्व समाजला धक्का बसला आहे. ज्ञानदानाचे कार्य 19 वर्षे केल्यानंतर एका प्रकारामुळे शिक्षकाने टोकाचे पाऊल गाठले. अपराधीपणाची भावना माझ्या मनात खोलवर रुजली, यामुळे मी हे पाऊल उचलत असल्याचे त्या शिक्षकाने म्हटलंय.

काय केले शिक्षकाने

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात हा प्रकार घडला. या तालुक्यात जावजीबुवाची वाडी हद्दीत जिल्हा परिषदेची होलेवस्ती येथे प्राथमिक शाळा आहे. या शाळेत अरविंद ज्ञानेश्वर देवकर यांची नुकतीच बदली झाली होती. 46 वर्षीय देवकर यांनी 19 वर्ष विविध ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य केले. शाळेत बदली होताच या शिक्षकाने आधी स्वच्छता मोहीम हाती घेतली. यामुळे 13 दिवस अध्यापन करु शकलो नाही, असे शिंदे यांनी म्हटले.

10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी शाळा सोडली

स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्याकडून शौचालय साफ करून घेणे पालकांना आवडले नाही. यामुळे 10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी जाबनीबुवा येथील शाळेत प्रवेश घेतला. देवकर यांच्या शाळेत एकच विद्यार्थी राहिला. यामुळे त्यांनी पालकवर्गाची माफी मागून एक संधी देण्याची विनंती केली. परंतु पालकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. समाजाचे आपल्याकडून नुकसान झाल्याची त्यांची भावना झाली. यामुळे वर्गातच त्यांनी विषारी तणनाशक पिऊन  जीवन संपवले.

या घटनेत कोणालाही जबाबदार धरु नये, असे अरविंद देवकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकारामुळे सर्वच शिक्षकांना धक्का बदला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.