AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 वर्षांचा माजी सरपंच, अल्पवयीन मुलीला लॉजवर घेऊन गेला आणि संतापजनक कृत्य

पुणे जिल्ह्यातील माजी सरपंचाने घृणास्पद कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

40 वर्षांचा माजी सरपंच, अल्पवयीन मुलीला लॉजवर घेऊन गेला आणि संतापजनक कृत्य
| Edited By: Chetan Patil | Updated on: Nov 24, 2022 | 11:24 PM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यातील माजी सरपंचाने घृणास्पद कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. नराधम माजी सरपंचाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी माजी सरपंचाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माजी सरपंचाची पीडित मुलीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली.

आरोपीने पीडित मुलीला बुधवारी बाहेर जेवायला जाऊ, असं सांगत एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आलाय. या दरम्यान पीडीत मुलीने बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले.

पीडितेच्या आईने तातडीने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेच पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी आरोपी माजी सरपंचाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow Us