Pune crime| अमेरिकेतून भारतात येऊन मोबाईल चोरणाऱ्याला अटक; 57 मोबाईल केले जप्त

पुणे स्टेशन परिसरात तो बस स्टॅन्ड , रिक्षासाठी वाट पाहत थांबलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावायचा व पळून जायचा. याप्रकारे अनेकदा त्याने चोऱ्या केल्या

Pune crime| अमेरिकेतून भारतात येऊन मोबाईल चोरणाऱ्याला अटक; 57 मोबाईल केले जप्त
crime
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 1:40 PM

पुणे – विमानाने प्रवास करत शहरात येऊन घरफोडी केल्याची घटना ताजी असतानाच अमेरिकेतून भारतात येऊन मोबाईल चोरणाऱ्याला(smuggling  mobile phone)  पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोएल शबान असे आरोपीचे नाव असून तो काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेतून भारतात आला आहे. सद्यस्थितीला तो भारताचा स्थायिक झालं आहे. आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ५७ मोबाईल जप्त केले आहेत.

असा चोरायचा मोबाईल

आरोपी नोएल शबान हा काही महिन्यापूर्वी अमेरिकेतून पुण्यात येऊन स्थायिक झाला होता. इथे आल्यानंतर तो चोरीच्या मार्गाला लागला. शहरातील पुणे स्टेशन परिसरात तो बस स्टॅन्ड , रिक्षासाठी वाट पाहत थांबलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावायचा व पळून जायचा. याप्रकारे अनेकदा त्याने चोऱ्या केल्या. एके दिवशी पीडित यश जैन हे पुणे स्टेशन बसस्टॉप जवळ ओला रिक्षाची वाट बघत होते. तितक्यात काळ्या रंगाच्या दुचाकीवरून नोएल आला व त्याने यश जैन यांच्या हातातील मोबाईल हिसकावला व तिथून पळ काढला. या घटनेनंतर जैन यांनी बंडगार्डन पोलीस स्थानकात मोबाईल चोरीची तक्रार नोंदवली. तसेच घडलेली सर्व घटना पोलिसांना संगितली. यापूर्वीही पोलिसांकडे या ठिकाणाहून मोबाईल चोरीच्या झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे पोलिसांनी तिथे सापळा रचून आरोपीला अटक केली.

तीन लाखांचा ऐवज केला जप्त
बंडगार्डन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या अमेरिकन चोरट्याला पडकण्यासाठी पोलिसांनी दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलं. आरोपीने 57 मोबाईल चोरले असल्याची कबुली  दिली . त्यात 17 मोबाईल व 4 दुचाकी असा एकूण 3 लाख सहा हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अध्यापक विकास संस्था शहाण्यांना अधिक शहाणं करणार; सुपेंबद्दल अजितदादा नेमकं काय म्हणाले?

Alia Bhatt | ‘बोल्ड, ब्युटिफुल अँड इलिगंट…’, आलिया भट्टचे लूक एकस्पिरीमेंट तुम्हीही करू शकता ट्राय!

TET exam Scam : पुणे पोलिसांचा धडाका सुरुच, आश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोनं, 24 किलो चांदी जप्त