अध्यापक विकास संस्था शहाण्यांना अधिक शहाणं करणार; सुपेंबद्दल अजितदादा नेमकं काय म्हणाले?

पेपरफुटीप्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना कानपिचक्या दिल्या आहेत. शहाण्यांना शहाणं करण्यासाठीच अध्यापक विकास संस्था काम करणार आहे.

अध्यापक विकास संस्था शहाण्यांना अधिक शहाणं करणार; सुपेंबद्दल अजितदादा नेमकं काय म्हणाले?
अजित पवार, उपमुख्यमंत्री
योगेश बोरसे

| Edited By: भीमराव गवळी

Dec 25, 2021 | 1:31 PM

पुणे: पेपरफुटीप्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना कानपिचक्या दिल्या आहेत. शहाण्यांना शहाणं करण्यासाठीच अध्यापक विकास संस्था काम करणार आहे, असं सांगतानाच कोण सुपे? त्यांच्याकडे नोटा सापडत आहेत. त्याचे धागेदोरे कुठपर्यंतही जाऊ द्या, त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी शिक्षकांनाही कानपिचक्या दिल्या. शहाण्यांना अधिक शहाणं करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. यशदा या संस्थेमार्फत या आधी प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन नवीन गोष्ट देण्याकरिता राज्य सरकारने पुढे राहिले पाहिजे. सारथीच्या इमारतीचे काम लवकरच सुरू करायचे आहे. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यावर त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

शिक्षकांनी बदललं पाहिजे

काळ बदलला आहे. विद्यार्थी बदलले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी बदलले पाहिजे. आजचे विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हुशार झाले आहेत. इंटरनेटमुळे जगाशी जोडले गेले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय माहिती मिळते यासंदर्भात आजचे विद्यार्थी जागृत आहेत. शिक्षकांनी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, त्यासाठी ही संस्था सुरू करण्याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार नाही

आपल्यात काही अधिकाऱ्यांना जास्त अधिकार दिले आहेत. त्याचा ते गैरफायदा घेतात. आता ते सुपेंचं ताज ताज उदाहरण आहे. कोण सुपे? त्याच्याकडे नोटा सापडत आहेत. कुणीही असो. त्याचे धागेदोरे कुठेही जाऊदे. त्यांच्यावर कारवाई होणारच. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कुणाला नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

सीबीआयला भरपूर कामे आहेत

पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे. असं पुन्हा घडू नये. यात राजकारण आणू नये. सीबीआयला भरपूर कामं आहेत. आपले पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. याआधीही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली. सुशांत सिंग प्रकरणात काय झालं? शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आलं. उगाच आभास करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू, असं त्यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेचा धोका आहे

कोरोनाचा धोका अजून कमी झालेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. सर्वांनी नियम पाळावेत, आता इथं काही पत्रकारांनी मास्क काढलेत. हे मी बोलणार नव्हतो. पण नियम सर्वांसाठी आहेत. ओमिक्रॉनचा धोका पाहून त्याचं तंतोतंत पालन करावं आणि तसं वागावं, असं सांगतानाच अनेक जण दुसऱ्या डोमेस्टिक विमान तळावर येतात, मग आपल्याकडे येतात. त्यांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी करायला हवी. थोडं तारतम्य बाळगायला हवं, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणतात, लॉकडॉऊनचा निर्णय राज्यांनी घ्यायचाय!

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: अटलजींच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी यांची आदरांजली, ‘सदैव अटल’ समाधी स्थळावर पुष्प अर्पण

तब्बल 29 वर्षांनी मृत पीडितेला मिळाला न्याय; आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला सक्तमजुरी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें