Pimpri- Chinchwad crime| पिंपरीतील लष्करी वसाहत व कार्यालयाच्या आवारातील चंदनाच्या ‘इतक्या’ झाडांची तस्करी

| Updated on: Jan 09, 2022 | 9:59 AM

चोरट्यांनी या तीन वेगवगळ्या परिसरातील जवळपास22 चंदनाच्या झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय परिसरात पाच दारुगोळा कारखान्यातील परिसरात सात व इतर परिसरातील 10 दहा झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

Pimpri- Chinchwad crime|  पिंपरीतील लष्करी वसाहत व कार्यालयाच्या आवारातील चंदनाच्या इतक्या झाडांची तस्करी
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us on

पिंपरी – पिंपरी -चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात एकीकडे दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला असताना दुसरकडे -देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय परिसरातीलचंदनाच्या झाडावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. ह्यासंदर्भात देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोराट्याविरोधात संबंधित कार्यालयीन अधीक्षकांनी तक्रार दाखल केली आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहे.

अशी घडली घटना
देहूरोड परिसरातील कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय व दारुगोळा कारखान्याच्या परिसर, सरकारी कर्मचारी वसाहत अलंकापुरी येथे चंदनाची झाडे आहेत. घटनेच्या वेळी चोरट्यांनी या तीन वेगवगळ्या परिसरातील जवळपास22 चंदनाच्या झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय परिसरात पाच दारुगोळा कारखान्यातील परिसरात सात व इतर परिसरातील 10 दहा झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

ओरिजनल चंदन म्हणून बाजारात विक्री
चंदनाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे चंदन तस्करांकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या चंदनाच्या झाडांचा शोध घेतला जातोय. याबरोबरच झाडे हेरुन त्यानंतर संपूर्ण झाडांची कत्तल करत झाडांमध्ये असलेल्या चंदनाच्या सुवासिक भागाची चोरी केली जातेय. ओरिजनल चंदन म्हणून बाजारात याला अधिक मागणी आहे. तस्करी केल्या सर्व चंदनाची विक्री काळया बाजारात केली जाते. यामध्ये लाखो रुपयांचा व्यवहार तस्कर करत असतात.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, कोरोना रुग्णवाढीत 3 टक्कयांनी घसरण

Feng Shui | विंड चाइम्सचे जादुई फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?, घराच्या दारात लावल्यास पडेल पैशांचा पाऊस

Constipation : बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!