Vaishnavi Hagawane Suicide Case : वैष्णवी हगवणेची आत्महत्या नव्हे तर खून? शवविच्छेदन रिपोर्टमध्ये खळबळजनक माहिती!
Vaishnavi hagawane Death : पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजले आहे. वैष्णवीची आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केलाय.

Vaishnavi hagawane Suicide Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. लग्नामध्ये वैष्णवीच्या कुटंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींना 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर तसेच अनेक मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. पण तरीदेखील तिने आत्महत्या केली आहे. तर दुसरीकडे आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून केलेला आहे, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण समोर आल्यानंतर वैष्णवीची एक कथित ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
अंगावर जखमा त्यामुळेही तिचा मृत्यू…
वैष्णवी हगवणे यांचा शवविच्छेदांना अहवाल tv9 मराठीच्या हाती लागला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झालाय. मात्र वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत. त्यामुळेही हा मृत्यू झालेला असू शकतो अशी शक्यता या शवविच्छेदन अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली का तिच्यासोबत काही घातपात घडला? असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झाले आहेत.
सॅम्पल विसेरा राखून ठेवला
तूर्तास वैष्णवी हिच्या शवविच्छेदनाचे सॅम्पल विसेरा हे राखून ठेवल्यात आले आहेत. तसे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वैष्णवीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
दरम्यान, वैष्णवी हगवणे हिची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ती तिच्या सासरच्या मंडळींबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच तिने तिचा पती शशांक याचाही या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख केला आहे. माझा नवरा माझा कधीच होऊ शकला नाही. सासू-सासरे तर असेच असतात. पण माझा नवरा माझा होऊ शकला नाही याचं मला फार दु:ख आहे, अशी खंत वैष्णवी या ऑडिओ क्लिपमध्ये बोलून दाखवताना दिसतेय. दुसरी बाब म्हणजे मी आता या सर्व प्रकरणाला कंटाळले आहे. त्यामुळे मी शशांकशी घटस्फोट घेणार आहे. मी याबाबत माझ्या पप्पांशी बोलले आहे. पप्पांनीही आपण यावर विचार करू असं सांगितलं आहे, अशी माहिती वैष्णवी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसत आहे.