पुण्याहून रांचीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा दावा, पोलिसांसह आख्खी यंत्रणा कामाला लागली आणि….

| Updated on: Oct 09, 2021 | 11:30 PM

या जगात विकृत आणि विचित्र लोकांची काहीच कमी नाही. आपल्या मनासारखं नाही घडलं तर अशी माणसं काहीही विचित्रप्रकार करुन बसतात. अशाच एका विचित्र इसमाचा अनुभव पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील प्रशासन आणि प्रवाशांना शुक्रवारी (8 ऑक्टोबर) आला आहे.

पुण्याहून रांचीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा दावा, पोलिसांसह आख्खी यंत्रणा कामाला लागली आणि....
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे : या जगात विकृत आणि विचित्र लोकांची काहीच कमी नाही. आपल्या मनासारखं नाही घडलं तर अशी माणसं काहीही विचित्रप्रकार करुन बसतात. अशाच एका विचित्र इसमाचा अनुभव पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील प्रशासन आणि प्रवाशांना शुक्रवारी (8 ऑक्टोबर) आला आहे. एक इसम त्याच्या पत्नीला विमानतळावर सोडण्यासाठी आला होता. त्याची पत्नी रांचीला निघाली होती. यावेळी त्याच्या पत्नीच्या परतीचं तिकीट मिळालं नाही म्हणून आरोपीने चक्क रांचीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचं म्हणत आरडाओरड केली. त्यामुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?

पुण्याच्या बाणेर येथील रहिवासी असलेला 28 वर्षीय ऋषीकेश सावंत याची पत्नी शुक्रवारी रांचीला जाणार होती. त्यासाठी तो त्याच्या पत्नीला घेऊन शुक्रवारी सकाळी लोहगाव विमानतळावर दाखल झाला. त्याची पत्नी 16 ऑक्टोबरला परत पुण्यात येणार होती. त्याच्या पत्नीचं 16 ऑक्टोबरचं परतीचं तिकीटही काढण्यात आलं होतं. पण धावपट्टीच्या कामामुळे 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळ बंद राहणार आहे. विमानतळावर दाखल झाल्यानंतर ऋषीकेश सावंतला याबाबतची माहिती मिळाली.

ऋषीकेशने विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली

ऋषीकेश सावंत विमानतळावर विमान कंपनीच्या कार्यालयात गेला. तिथे त्याने आपल्या पत्नीचं तिकीट 15 ऑक्टोबरला अधिकृत करण्याची विनंती केली. पण संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिला. यामुळे ऋषीकेश सावंतला प्रचंड राग आला. त्याने याच रागातून रांचीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. त्याने विमानात बॉम्ब असल्याची आरडाओरड केली. त्याच्या या अफवेमुळे विमानतळावर प्रचंड खळबळ उडाली.

अखेर आरोपीला बेड्या, विमानाला तीन तास उशिर

विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलीसही सतर्क झाले. पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, राज्य राखीव बलाच्या तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित विमान बाजूला घेतले. त्यांनी त्या विमानाची कसून तपासणी केली. पण त्यात काहीच सापडलं नाही. या दरम्यान आरोपी ऋषीकेशने विमानातील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तवन केलं. आरोपीने सांगितलेली माहिती ही खोटी असल्याने पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटकही केली. या सर्व प्रकारामुळे विमानाला रांचीला पोहोचण्यास तीन तास उशिर झाला. त्यामुळे प्रवाशांनाही मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

तरुणांनो राग ताब्यात ठेवा

अनेक तरुणांचा रागावरती संयम नसतो. त्यामुळे रागाच्याभरात त्यांच्याकडून काही विपरीत घटना घडण्याची शक्यता जास्त असते. काही तरुण रागात काहीही चुकीचा निर्णय घेतल्याने त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे त्यांनी रागावरती नियंत्रण ठेवणं जास्त आवश्यक आहे. रागावर संयम ठेवला तरं त्यांनाच त्याचा फायदा होईल.

हेही वाचा :

बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचं दुकान लुटण्याचा प्रयत्न, पण मालकाच्या प्रसंगावधानाने दरोडेखोरांची ‘रनिंग स्पर्धा’

जोडीदारासोबत लैंगिक समस्यांनी त्रस्त, त्याने थेट धारदार चाकूने स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

आधी बायकोसोबत कडाक्याचं भांडण, नंतर भाच्याला घरी बोलावलं, त्याच्यासोबतही वाद, लोखंडी रॉडने हत्या