जोडीदारासोबत लैंगिक समस्यांनी त्रस्त, त्याने थेट धारदार चाकूने स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

एका 45 वर्षीय व्यक्तीने जोडीदारासोत असलेल्या लैंगिक समस्यांमुळे त्रस्त होऊन स्वत:चं गुप्तांग धारधार चाकूने कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जोडीदारासोबत लैंगिक समस्यांनी त्रस्त, त्याने थेट धारदार चाकूने स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?
प्रातिनिधिक फोटो

नैरोबी (केनिया) : जगभरात अनेक चित्रविचित्र घटना घडत असतात. त्यातीलच एक विचित्र घटना केनियातून समोर आली आहे. एका 45 वर्षीय व्यक्तीने जोडीदारासोत असलेल्या लैंगिक समस्यांमुळे त्रस्त होऊन स्वत:चं गुप्तांग धारधार चाकूने कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेडिकल जर्नलमध्ये या घटनेची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानंतर जगभरातील माध्यमांचं या घटनेकडे लक्ष गेलं आहे. संबंधित व्यक्तीने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? असा सवाल काही जणांच्या मनात उपस्थित होतोय.

डॉक्टरांनी पीडित रुग्णाचा लिंग जोडण्याचा प्रयत्न केला, पण…

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित पीडित व्यक्ती हा मानसिक रुग्ण आहे. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण त्याने काही दिवसांपासून औषधं घेण्यास बंद केलं होतं. त्यामुळे संबंधित घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पीडित व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सुरुवातीला पीडित व्यक्तीचं लिंग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र लिंग कापून बराच वेळ झाल्याने तसेच ते व्यवस्थित ठेवलेलं नसल्याने त्यांना तसं करता आलं नाही.

रुग्णाने आत्महत्या केली का?

पीडित व्यक्ती हा मनोरुग्ण आहे. त्याने घरात असताना किचनमध्ये जाऊन धारदार चाकूने स्वत:चं लिंग कापलं. विशेष म्हणजे या घटनेनंतर जवळपास 16 तास घरातील कुणालाही या घटनेची माहिती मिळाली नाही. कुटुंबियांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. पीडित व्यक्तीने लिंग कापून आत्महत्या केली का? असा विचार यावेळी उपस्थित करण्यात आला होता. खरंतर गुप्तांग कापून आत्महत्येचा प्रयत्न करण्याला फालसीसाईड म्हटलं जातं. पण तसं काहीसं या प्रकरणात दिसलं नाही. संबंधित व्यक्ती ही मानसिक रुग्ण आहे. पण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डॉक्टरांची नेमकी प्रतिक्रिया काय?

या दरम्यान रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या घटेनवर प्रतिक्रिया दिली आहे. “पीडित व्यक्तीने गुप्तांग कापल्यानंतर जवळपास 16 तासांनी त्याचे नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन आले. यावेळी त्याचे नातेवाईक पीडित व्यक्तीचं कापलेलं लिंगही घेऊन आले होते. संबंधित व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत लैंगिक समस्यांमुळे त्रस्त होता. त्यानंतर त्याने रागात स्वत:चं गुप्तांग कापण्याचा निर्णय घेतला. खरंतर अशा प्रकारच्या घटना फार कमी घडतात. याशिवाय मनोरुग्ण किंवा ड्रग्जच्या आहारी गेलेले व्यक्तीच अशाप्रकारचं कृत्य करतात”, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा :

मुंबईतल्या हायप्रोफाईल ड्रग्जकांडातही आता केंद्र विरुद्ध ठाकरे सरकार? मलिक म्हणतात, ‘मुंबई पोलीसांनीही चौकशी करावी’

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचं लावलं लग्न; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

NCB अधिकारी वानखडेंच्याविरोधात कारवाई करा, राष्ट्रवादीच्या मागणीवर आता NCB चं उत्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI