Pune Crime : आधी वारंवार शरीर संबंध! नंतर आवडत्या पदार्थातून दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, इंजीनियरचं कांड ऐकून…
Pune Crime: पुण्यातील हिंजवडी येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका इंजिनिअरने प्रेयसीच्या नकळत रबडीमधून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आहेत.

आजकाल पुण्यामधून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्यात एका तरुणीने धक्कादायक तक्रार केली आहे. या तरुणीचे एका इंजिनिअर मुलासोबत प्रेमसंबंध होते. हा तरुण लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत सतत शारिरीक संबंध ठेवता होता. दरम्यान, तरुणी गर्भवती असल्याचे कळाले. त्यानंतर जे घडले ते ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.
प्रकरण काय आहे?
पीडित तरुणी आणि इंजिनिअर आदर्श मेश्राम यांचे 2018 पासून प्रेमसंबंध होते. कॉलेजच्या काळात दोघांची ओळख झाली होती. या काळात आदर्शने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु, जेव्हा तरुणी गर्भवती झाली, तेव्हा आदर्शने लग्नास स्पष्ट नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनुसार, 3 जुलै 2025 रोजी आदर्शचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती यवतमाळहून पुण्यात आली होती. यावेळी आदर्शने तिच्यासाठी रबडी आणली होती, परंतु त्यात गर्भपाताची गोळी मिसळली होती. पीडितेला याची माहिती नसल्याने तिने रबडी खालली आणि काही वेळातच तिचा गर्भपात झाला.
वाचा: ब्रेकअपनंतर ती दुसऱ्या पुरुषाच्या संपर्कात, रात्री बॉयफ्रेंड घरी आला अन्… पोलिसही हादरले
मोबाईलमुळे उघड झाले रहस्य
पीडितेच्या मोबाईलमध्ये आदर्शचे इतर मुलींशी असलेले संदेश आणि संबंध स्पष्टपणे दिसून आले. यामुळे तिला आपली फसवणूक झाल्याचे समजले. तिने आदर्शच्या आधीच्या प्रेयसीशी संपर्क साधला असता, तिलाही असाच विश्वासघात झाल्याचे उघड झाले. या धक्कादायक घटनेनंतर पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), कलम 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा तपास सुरू आहे.
पीडितेची तक्रार
तक्रारीत पीडितेने नमूद केले की, आदर्श वाल्मिक मेश्राम याचे इतर मुलींशीही संबंध होते. त्याच्या मोबाईलमधील संदेशांमुळे त्याचे इतर मुलींशी असलेले संबंध उघड झाले. आदर्शच्या आधीच्या प्रेयसीनेही सांगितले की, तिच्यासोबतही लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करण्यात आले होते. 3 जुलै रोजी आदर्शने रबडीत गर्भपाताच्या गोळ्या मिसळून तिला खायला दिल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. उपचारानंतर पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या पुढील तपास सुरू आहे.
