AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर मार्केट आणि Rummy च्या नादाने पैसा गमावला, कर्ज फेडण्यासाठी तरूणानेच कॉलेजमधल्या मैत्रिणीला संपवलं

नुकतीच पुण्यात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची अपहरण करून हत्या करण्यात आली. खंडणी मिळाल्यानंतर तिची हत्या करायची, असे आरोपींनी आधीच ठरवले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यासाठी एका ठिकाणी त्यांनी खड्डाही खोदला होता.

शेअर मार्केट आणि Rummy च्या नादाने पैसा गमावला, कर्ज फेडण्यासाठी तरूणानेच कॉलेजमधल्या मैत्रिणीला संपवलं
| Updated on: Apr 11, 2024 | 12:23 PM
Share

एका 22 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीच्या हत्येमुळे पुणं हादरलं. भाग्यश्री सुडे हिची पैशांसाठी हत्या करण्यात आली. तिची हत्या हा सुनियोजित कट होता. हत्येआधी आरोपींनी तिचे अपहरण केले होते. त्यानंतर तिला मारण्याची योजना आखण्यात आली. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डाही खोदण्यात आला होता. एजन्सीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या विद्यार्थिनीच्या हत्येमागे तीन आरोपी होते. तिघांलरही बरंच कर्ज झाल्याने त्यांनी अपहरण करून पैसे तिच्या पालकांकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून कसून चौकशी सुरू आहे.

विद्यार्थिनीच्या कॉलेजमधील मित्रच होता मुख्य आरोपी

शिवम फुलावले असे या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव असून तो भाग्यश्रीच्या कॉलेजमध्ये शिकत असून तिचा मित्र होता. मात्र शिवम याने शेअर मार्केटमध्ये बरेच पैसे गमावले होते. तर हत्येतील इतर दोन आरोपींनी ऑनलाइन रमीत पैसे गमावले. शिवम याने सुरेश इंदुरे आणि सागर जाधव सोबत मिळून 30 मार्च रोजी पु्ण्यातील विमाननगर येथीन भाग्यश्रीचे अपहरण केले. मात्र अपहरणानंतर काही काळातच तिचा मृत्यू झाला. आरोपीने तिच्या नाका- तोंडाला टेप लावली होता. पण भाग्यश्रीने त्यांना विरोध केला तेव्हा एका आरोपीने तिचे तोंड बंद केले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

आधीच रचला हत्येचा कट

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, मृत विद्यार्थी भाग्यश्री आणि मुख्य आरोपी शिवम फुलावळे हे दोघेही मध्य महाराष्ट्रातील लातूरचे रहिवासी असून एकाच महाविद्यालयात शिकत होते. शिवमचे शेअर बाजारात चांगलेच नुकसान झाले होते. तर आणखी एका आरोपीला ऑनलाइन रमी खेळण्याचे व्यसन होते, ज्यामध्ये त्याने बरेच पैसे गमावले होते. दोघेही कर्जात बुडाले. भाग्यश्रीचे वडील एका सहकारी संस्थेचे संचालक आहेत. तिचे कुटुंब श्रीमंत असल्याचे आरोपीला वाटत होते. त्यामुळे आरोपींनी खंडणीसाठी तिचे अपहरण करण्याचा कट रचला.

मात्र अपहरणानंतर आरोपींनी भाग्यश्रीची हत्या करण्याचे ठरवले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी अहमदनगरच्या हद्दीतील कामरगावजवळ आधीच खड्डा खोदला होता. आरोपींना आधी खंडणीचे पैसे मिळवायचे होते. मात्र त्याआधीच भाग्यश्रीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह कमरगांव येथे नेला आणि पेट्रोल टाकून तिला जाललं. अर्धवट जळालेला मृतदेह त्यांनी आधीच खणलेल्या खड्ड्यात पुरला.

अशी केली अटक

यानंतर तिन्ही आरोपींनी विद्यार्थिनीच्या पालकांना तिच्या मोबाईलवरून फोन करून नऊ लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी भाग्यश्रीचे डेबिट कार्ड आणि खात्याचा तपशील घेतल्याने त्यांनी तिच्या वडिलांना तिच्या अकाऊंटमध्येच पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर 2 एप्रिल रोजी भाग्यश्रीचा कुटुंबीयांनी आपली मुलगी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या फोनवर खंडणीचा कॉल आल्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. आरोपी लातूरला एका लॉजमध्ये थांबले होते. यानंतर ते रायगडमधील खोपोली येथे गेला, त्यानंतर तेथून मुंबईला गेला. यातील एक आरोपी पुन्हा पुण्यात आला.

सापळा रचून अटक

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी भाग्यश्रीच्या पालकांना तिच्या बँक खात्यात काही पैसे जमा करण्यास सांगितले. कारण त्यानंतर आरोपी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये नक्कीच जाणार होते. यानंतर पोलिसांनी ७ एप्रिल रोजी आरोपींना सापळा रचून पकडले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली तसेच तरूणीचा मृतदेह पुरला ती जागाही दाखवली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.