AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Porcshe Accident : पुन्हा तेच घडलं… बिल्डरपुत्र नव्हे त्याचा ड्रायव्हर चालवत होता कार; नव्या दाव्याने खळबळ

पुण्यातील कल्याणीनगर येथील कार अपघात प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील आणि त्या कारमध्ये उपस्थित असलेल्या मित्रांच्या दाव्यानुसार, अपघातावेळी ती कार आरोपी मुलगा नव्हे तर ड्रायव्हर चालवत होता.  मीच ती कार चालवत होतो, असे ड्रायव्हरनेही पोलिसांना दिलेल्या जबाबात कबूल केले आहे.

Pune Porcshe Accident : पुन्हा तेच घडलं... बिल्डरपुत्र नव्हे त्याचा ड्रायव्हर चालवत होता कार; नव्या दाव्याने खळबळ
अपघातवेळी गाडी नेमकं कोण चालवत होतं ?
| Updated on: May 24, 2024 | 12:02 PM
Share

पुण्यातील कल्याणीनगर येथील कार अपघात प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील आणि त्या कारमध्ये उपस्थित असलेल्या मित्रांच्या दाव्यानुसार, अपघातावेळी ती कार आरोपी मुलगा नव्हे तर ड्रायव्हर चालवत होता.  मीच ती कार चालवत होतो, असे ड्रायव्हरनेही पोलिसांना दिलेल्या जबाबात कबूल केले आहे. या नव्या दाव्यामुळे मात्र एकच खळबळ माजली आहे. धनिकपुत्राला वाचवण्यासाठी हा दावा करण्यात येत आहे का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान आरोपीचे वडील विशाल अग्रवाल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला आहे.

मुलगा नव्हे ड्रायव्हर चालवत होता कार

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे दुर्घटननेप्रकरणी विशाल अग्रवालची सध्या चौकशी सुरू आहे. दुर्घटनेच्या वेळेसे त्याचा फॅमिली ड्रायव्हर हा कार चालवत होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांनीही हाच जबाब दिला आहे. आता या प्रकरणात नवे अपडेट आले आहेत की ज्या फॅमिली ड्रायव्हरने कार चालवल्याचे सांगितले जात होते, त्याची पोलिसांनी गुरूवारी (23 मे) पुन्हा चौकशी केली.

या फॅमिली ड्रायव्हरने आधीच्या जबाबात असा दावा केला होचा की दुर्घटना घडली तेव्हा तोच कार चालवत होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान देखील या ड्रायव्हरने हीच गोष्ट कबूल केली आहे. तर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनीही असाच दावा केला की त्यांनी नियुक्त केलेला ड्रायव्हरच पोर्शे कार चालवत होता.

RTO ची मोठी कारवाई

अपघाताआधी ही कार ज्या रस्त्यावरून गेली त्या संपूर्ण रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी गोळा केलं आहे. कार नेमकं कोण चालवत होतं हे जाणून घेण्यासाठी तो अल्पवयीन आरोपी आणि त्याचे मित्र ज्या-ज्या पबमध्ये गेले होते, तेथील सीसीटीव्हीदेखील पोलिसांकडून चेक करण्यात येत आहेत. दरम्यान RTOने याप्रकरणी मोठं पाऊल उचललं आहे. तो अल्पवयीन मुलगा जोपर्यंत 25वर्षांचा होत नाही, तोपर्यंत त्याला लायसन्स जारी करण्यात येणार नाही. तसेच अपघातग्रस्त पोर्शे गाडीचे रजिस्ट्रेशन हे 12महिन्यांसाठी रद्द करण्यात आले आहे. .

अंमली पदार्थांचे केले सेवन ?

ज्या दिवशी अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली, तेव्हा अंमली पदार्थांचेही सेवन करण्यात आले असावे, असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन आरोपीचे आजोबा, सुरेंद्र अग्रवाल त्यांनाही काल पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. छोटा राजनशी असलेल्या कनेक्शनबाबत सुरेंद्र यांचा काय संबंध आहे, हे तपासण्यासाठी काल सुरेंद्रकुमार यांची चौकशी केली. ज्या पोर्शे कारमुळे हा अपघात झाला त्या कारची फॉरेन्सिक तपासणीदेखील पोलिसांनी केली आहे. दोन दिवस केलेल्या तपासाच्या अनुषंगाने पोलिस आज कोर्टात काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना