AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात शिक्षण क्षेत्रात भूकंप, गणितात पास करण्याच्या नावाखाली प्राध्यापकाचा लाखोंचा घोटाळा, नेमकं काय घडलं?

पुण्यातील वाघोली येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून गणितात पास करण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. पोलिसांनी प्राध्यापक प्रतिक सातव यांसह तीन अन्य आरोपींना अटक केली आहे.

पुण्यात शिक्षण क्षेत्रात भूकंप, गणितात पास करण्याच्या नावाखाली प्राध्यापकाचा लाखोंचा घोटाळा, नेमकं काय घडलं?
maths teacher
| Updated on: Jun 03, 2025 | 8:45 PM
Share

इंजिनिअरिंगचे पहिले वर्षाचे गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांची बोबडी वळते. हीच अडचण हेरून पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना गणितात पास करुन देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्राध्यापकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना गणितात पास करून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याची घटना घडली आहे. प्राध्यापक प्रतिक सातव हा महाविद्यालयात दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या गणिताच्या पेपरनंतर रात्रीच्या वेळी कॉलेजमध्येच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेत होता. ज्या विद्यार्थ्यांना गणित २ या विषयात नापास होण्याची भीती वाटत होती, अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून तो १० ते ५० हजार रुपये उकळायचा. आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून हा गोरखधंदा सुरू होता.

चार जणांना अटक

याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘गणित २’ या विषयाच्या लिहिलेल्या उत्तरपत्रिकांचे ६ बंडल, तसेच २ लाख ६ हजार रुपये रोख आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्राध्यापक प्रतिक किसन सातव, आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे अशी आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ

‘गणित २’ या विषयात नापास होण्याची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून आपल्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून १० ते ५० हजार रुपये स्वीकारण्यात येत होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!