लोकल ट्रेनमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या गायकाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकल ट्रेनमध्ये मुलींची छेड काढल्यानंतर फरार झालेल्या गायकाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या.... मुंबई पोलिसांनी अटक केल्यामुळे गायक वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

लोकल ट्रेनमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या गायकाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
mumbai-local
Image Credit source: mumbai-local
| Updated on: Mar 29, 2023 | 4:44 PM

मुंबई : लोकले ट्रेन (Local Train) अनेक घटना घडत असतात. पण काही घटना अशा असतात ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडते. नुकताच मुंबई पोलिसांनी (Railway Police) लोकल ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढल्यानंतरnएका गायकाला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या गायकाचं नाव दीपक पुजारी (Deepak Pujari) असं आहे. दीपकचे सोशल मीडियावर देखील अनेक गाणी आहेत. मुंबई पोलिसांनी अटक केल्यामुळे दीपक पुजारी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. १९ वर्षीय मुलीची छेड काढल्यामुळे पोलिसांनी फरार दीपकला बेड्या ठोकल्या आहेत.

दीपक पुजारी कायम युट्यूबवर कायम भोजपुरी गाण्यावर आश्लील व्हिडीओ पोस्ट करत असतो. रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम (Anil Kadam) यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी परीक्षेसाठी जात होती. तेव्हा रेल्वे स्थानकावर दीपक याने मुलीची छेड काढली.

मुलीने घडला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मुलीची तक्रार ऐकल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासा दरम्यान सीसीटीवी सर्विलान्स (CCTV Surveillance) च्या मदतीने मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर दीपक पुजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पुजारी याने आरोप कबूल केले आहेत. मुलीची छेड काढल्यानंतर दीपक विरार याठिकाणी पळून गेला होता. पण काही पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी दीपक पुजारी याला अटक केला आहे.

आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास करत आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपी दीपक पुजारीने अनेक भोजपुरी अल्बममध्ये गाणी गायली आहेत. सध्या सर्वत्र दीपक पुजारी याचीच चर्चा रंगत आहे.

दीपक पुजारी याला अटक केल्यानंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दीपक पुजारी याने अनेक एल्बम यूट्यूबवर आहेत. सध्या दीपक पुजारी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.