
Raja Raghuvanshi Murder Case : मध्य प्रदेशच्या राजा रघुवंशी याच्या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच त्याला संपवलं आहे. विशेष म्हणजे सोनमचा प्रियकर कराज कुशवाहा याचाही यामागे मोठा हात असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मेरठमधील मुस्कान या महिलेने तिचा प्रियकर साहील शुक्ला याच्या मदतीने तिच्या नवऱ्याला मारून ड्रममध्ये भरलं होतं. अशा घटना समोर आल्यानंतर आता तरुणी छपरी मुलांच्या प्रेमात का पडतात? छपरी मुलांची मानसिकता काय असते? हे जाणऊ घेऊ या…
आजकाल सोशल मीडियाच्या काळात बाहेरून व्यक्ती कशी दिसतेय, याला फार महत्त्व आहे. अनेक तरुणी अशाच बाहेरून छान दिसणाऱ्या तरुणांना पाहिल्यावर त्यांच्यावर भाळतात. काही मुली तर छपरी मुलांच्या जाळ्यात लगेच फसतात. छपरी मुलांना बाहेरून टापटीप दिसालया आवडतं. पण त्यांच्या विचारांत कोणतीही स्पष्टता नसते. अशा तरुणांना कोणतेही सामाजिक भान नसते. त्यांच्यात सामाजिक जागलेपण नसते. तरुणाईवर स्वार होऊन नियमबाह्य, थ्रिलिंग गोष्टी करणं या छपरी तरुणांना आवडतं. छपरी तरुणांच्या याच वृत्तीला अनेक तरुणी भाळतात.
मेरठ आणि इंदौर हत्याकांडातील साहील शुक्ला आणि राज कुशवाहा यांच्यावर मुस्कान आणि सोनम भाळल्या असल्या तरी ते छपरी तरुणांच्या श्रेणीतच मोडतात. साहीलला मद्य, गुटखा, ड्रग्जसेवनाची सवय होती. त्याच्या घरातून मद्याच्या बॉटल मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे सोमनचा प्रियकर असलेला राज कुशवाहा हा अवघ्या 21 वर्षांचा तरुण होता. तो सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात साधा कर्मचारी होता. तरीदेखील मुस्कान आणि सोनम या साहील आणि राज यांच्या प्रेमात पडल्या. छपरी तरुणांच्या बाह्यरुपावर जशा तरुणी भाळतात अगदी तशाच पद्धतीने या दोघी साहील आणि राज यांच्या प्रेमात पडल्या.
छपरी मुलं तरुणींना कसं जाळ्यात ओढतात याविषयी मानसशास्त्रज्ञ डॉ. विधी एम पिलानिया यांनी सांगितलं आहे. समाजाला ही तरुण मुलं छपरी वाटतात. मात्र ज्या मुली त्यांच्या प्रेमात पडतात त्यांच्यासाठी हे तरुण फार महत्त्वाचे असतात. तरुणी अशा मुलांमध्ये मानसिक समाधान शोधतात. अशी मुलं तरुणींना मानसिक आधार देतात. अशा प्रकारची छपरी मुलं तरुणींच्या सर्व इच्छा- आकांक्षा पूर्ण करतात. अशी मुलं ही तरुणींना आम्ही फार चांगले असल्याचे दाखवतात, असे पिलानिया यांनी सांगितले.
दरम्यान, तरुणींनी जोडीदार निवडताना योग्य काळजी घेतली पाहिजे. तरुणांच्या बाह्यरुपाला न भाळता त्याचे विचार, आचार काय आहेत हे सर्वार्थाने जाणून घेऊनच प्रेमात पडावे, असे जाणकार सांगतात.