
महिन्याभरापूर्वी पालक, नातेवाईक, मित्रमंडळींच्या उपस्थिती वाजत-गाजत लग्न केलेल्य सोनमने अवघ्या काही दिवसांतच पती राजा रघुवंशीची निर्घृण हत्या केली. यामुळे फक्त इंदौरच नव्हे अख्खा देशही हादरला आहे. पण सोनम रघुवंशीने तिच्या पतीची हत्या का केली? हा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे. त्याचं उत्तर म्हणजे तिचा प्रियकर राज कुशवाह – पण सोनमचा भाऊ गोविंदच्या सांगण्यानुसार, सोनम ही राजला राखी बांधायची. राजच्या मोबाईलमध्ये सोनमचा नंबर ‘दिदी’ म्हणून सेव्ह होता. हे जर खरं असेल तर मग सोनमचा पती राजाच्याहत्येचं खरं कारण काय ? यासंदर्भात तपासणी करताना सोनमला ओळखणाऱ्या लोकांशी बोलून तिचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार बरीच धक्कादायक माहिती समोर आली.
दोन वर्षांपूर्वी बनवला टॅटू
सोनम कमी शिकलेली होती, पण तीन वर्षे तिने तिचा भाऊ गोविंदला त्याच्या व्यवसायात मदत केली आणि तो पुढे नेला. सोनम इंदूरमध्ये काम सांभाळत असे आणि भाऊ गोविंद गुजरातच्या बाजारपेठेची काळजी घेऊ लागला. सोनमला तिचे आयुष्य तिच्या स्वतःच्या इच्छेनुसार जगायचे होते. मंगल सिटी मॉलमधील तिच्या फर्मजवळ, दीड वर्षांपूर्वी तिने वाहत्या लाटांचा टॅटू काढला होता. ती तिच्या स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगू इच्छिते, हे तिचे विचार त्यातून दिसतात. तिच्या कुटुंबाने आयुष्यात हस्तक्षेप करणं सोनमला आवडत नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.
लग्नासाठी दबाव वाढल्यावर 5 महिन्यांपूर्वी राजला बनवलं प्रियकर
सोनमला मंगळ असून ती 26 वर्षांची आहे. जेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला तेव्हा सोनमने पाच महिन्यांपूर्वीच तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या राज कुशवाहाला तिचा प्रियकर बनवले. राज तिच्या फर्ममध्ये कर्मचारी होता. राज केवळ सोनमसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी समर्पित होता. तो सोनमच्या कुटुंबाच्या गाड्याही चालवत असे आणि तिच्या वडिलांना आणि आईलाही गाडूतन बाहेर घेऊन जायचा. सोनमला राजसारखा जीवनसाथी हवा होता, जो तिचं म्हणणं ऐकेल, तिच्या अधीन राहील आणि तिच्या निर्णयांना विरोध करणार नाही. राजने खून करून हे सिद्धही केलंच. सोनमचा असा विचार होता की ती राजसारख्या तरुणाशी लग्न करेल आणि तिचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळेल, जर तिने दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर हे शक्य नव्हते. मात्र जेव्हा राजा रघुवंशीसोबत तिचं लग्न ठरलं तेव्हा तिने आई-वडिलांना सुनावलंही होती. तुम्ही तुमच्या मनाचं करून तर दाखवा, मग बघा मी काय करते.. अशा शब्दांत तिने धमकी दिली होती.
अँटीसोशल पर्सनॅलिटीची शिकार ?
सोनमला तिच्या पतीला मारल्याचा जराही पश्चात्ताप नाही. ती फक्त तिच्या भावासमोर रडली. अटक झाल्यावरही गाजीपूरमधील केंद्रात सात तास झोपली. सोनमसारख्या लोकांना असामाजिक व्यक्तिमत्व विकाराने (अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) असू शकतं असं मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा लोकांना चूक केल्यानंतरही पश्चात्ताप होत नाही. सोनममध्येही ही लक्षणे दिसून आली. अटक झाल्यानंतर ती रडली नाही, ती फक्त दुःखाने तिथेच बसली. ती सात तास झोपली देखील. या विकाराने ग्रस्त असलेले लोक इतरांच्या भावना आणि हक्कांना महत्त्व देत नाहीत. ते इतरांना हाताळण्याचा, दडपण्याचा आणि फसवण्याचा प्रयत्न करतात. लग्नानंतर सोनमचे राजासोबतचे वर्तन असेच होते.
मनासारखं झालं नाही तर कोणत्याही थराला जाऊ शकतात
अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेले लोक, हे त्यांच्या मनासारखं झालं नाही तर कोणत्याही थराला जाऊ शकतात. जे नॉर्नल लोक करणार नाहीत. सोनमच्या बाबतीतही असेच घडले. तिला लग्न करायचे नव्हते, म्हणून तिने तिच्या पतीला मार्गातून हटवण्याची योजना आखून तिचा हट्ट पूर्ण केला. तिने तिच्या वागण्यातून कधीही तिच्या अंतर्गत भावना प्रकट होऊ दिल्या नाहीत. तिच्या इच्छेविरुद्ध घेतलेल्या निर्णयाचा बदला घेण्याच्या तिच्या हट्टीपणामुळे ती खुनापर्यंत पोहोचली, असं मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल टीव्ही9 प कुठलाही दावा करत नाही, अथवा पुष्टी करत नाही.)