सहा वर्षांच्या मुलासमोर डीएसपींसोबत आंघोळ, निलंबित महिला कॉन्स्टेबलला अटक

| Updated on: Sep 13, 2021 | 12:37 PM

राजस्थानमध्ये अजमेर जिल्ह्यातील पुष्कर शहरातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये 10 जुलै रोजी संबंधित महिला कॉन्स्टेबलच्या मोबाइलवरुन ही व्हिडीओ क्लिप काढण्यात आली होती. आरपीएस अधिकारी हिरालाल सैनी अजमेर जिल्ह्यात बॅवर सर्कल अधिकारी म्हणून, तर महिला कॉन्स्टेबल जयपूरमध्ये तैनात होती.

सहा वर्षांच्या मुलासमोर डीएसपींसोबत आंघोळ, निलंबित महिला कॉन्स्टेबलला अटक
Rajasthan DSP
Follow us on

जयपूर : महिला कॉन्स्टेबल आपल्या सहा वर्षांच्या मुलासमोर पोलीस उपअधीक्षक अर्थात डीएसपींसोबत आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी निलंबित महिला कॉन्स्टेबलला आता अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने महिलेला बेड्या ठोकल्या. दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर तिला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी, या प्रकरणात राजस्थान पोलिस सेवेतील अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली होती, त्याला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) चे म्हणणे आहे, की पोलीस कॉन्स्टेबलला तिच्या काकांच्या निवासस्थानी कलवार भागात ठेवण्यात आले होते. तिला पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली असून तिची चौकशी केली जात आहे.

काय आहे प्रकरण

सूत्रांनी सांगितले की, राजस्थानमध्ये अजमेर जिल्ह्यातील पुष्कर शहरातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये 10 जुलै रोजी संबंधित महिला कॉन्स्टेबलच्या मोबाइलवरुन ही व्हिडीओ क्लिप काढण्यात आली होती. आरपीएस अधिकारी हिरालाल सैनी अजमेर जिल्ह्यात बॅवर सर्कल अधिकारी म्हणून, तर महिला कॉन्स्टेबल जयपूरमध्ये तैनात होती.

अधिकारी हिरालाल सैनी या महिला कॉन्स्टेबलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रिसॉर्टमध्ये गेले होते. एसओजीच्या माहितीनुसार ते तिच्या सहा वर्षांच्या मुलासह रिसॉर्टच्या खोलीला जोडलेल्या एका खाजगी स्विमिंग पूलमध्ये अश्लील वर्तन करत होते.

व्हिडीओ व्हायरल कसा झाला

‘महिला एका वेगळ्या फोल्डरमध्ये व्हिडीओ क्लिप सेव्ह करत होती, पण अनवधानाने ती तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट झाली, हा व्हिडीओ तिचा पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांनीही पाहिला.

महिलेची पतीपासून फारकत

निलंबित डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबल यांच्यात सुमारे 5 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध असल्याचे एसओजीच्या चौकशी दरम्यान आढळून आले आहे. या नात्यामुळे महिला कॉन्स्टेबलने आपल्या पतीला सोडले होते.

खरं तर, कॉन्स्टेबलच्या पतीने नागौर पोलीस अधीक्षकांकडे पॉक्सो कायद्यांतर्गत दोघांविरोधात एफआयआर नोंदवण्याची तक्रार पाठवली होती. ही तक्रार 10 ऑगस्ट रोजी चितवा पोलीस स्टेशनच्या एसएचओकडे पाठवण्यात आली होती परंतु त्यांनी नोंदणी केली नाही.

पतीची तक्रार

महिला कॉन्सटेबलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या पतीनं पोलीसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यानं म्हटलं की, 2001 मध्ये त्याचं कुचामन सिटीतल्या एका मुलीशी लग्न झालं. त्यानंतर तिला 2008 मध्ये राजस्थान पोलीसमध्ये नोकरी लागली. 2015 साली त्यांना एक मुलगा झाला. हा तोच मुलगा आहे जो त्या अश्लील व्हिडीओत दिसत आहे.

नवऱ्याच्या तक्रारीनुसार या व्हिडीओमुळे त्याची आणि मुलाची बदनामी झालीय. याची तक्रार देण्यासाठी तो नागौरच्या पोलीस ठाण्यात गेला पण तिथं पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करुन घेतली नाही. कारण प्रकरण डीएसपीशी संबंधित होतं. आता पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रकाश मीना यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण तापल्यानंतर महिला कॉन्सटेबलच्या पतीची तक्रार दाखल करुन घेऊन डीएसपीसहीत महिला कॉन्सटेबलवर रितसर कारवाई करण्यासाठी चौकशी सुरु करण्यात आली. सध्या दोघेही निलंबीत असून दोघांनाही संबंधित कार्यालयात हजेरी लावण्यात आलीय.

महिला काँस्टेबलचीही तक्रार

याआधी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात, महिला कॉन्स्टेबलने जयपूरच्या कलवार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती की कोणीतरी तिला फोन करून सांगितले की त्याच्याकडे महिलेचे अश्लील व्हिडिओ आहेत आणि तिच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केली होती.

चितवा आणि कलवार पोलीस स्टेशनचे एसएचओ, प्रकाश चंद मीना आणि गुरु दत्त सैनी, कुचमन सर्कल ऑफिसर मोटाराम बेनीवाल आणि झोटवाडा एसीपी हरी शंकर शर्मा यांनाही शुक्रवारी निलंबित करण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती होती परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.

संबंधित बातम्या :

धक्कादायक! डीएसपीची महिला कॉन्सटेबलसोबत अंघोळ, व्हिडीओत अश्लिल चाळे, तेही सहा वर्षाच्या मुलासमोर

#क्राईम_किस्से : Amruta Deshpande | एकतर्फी प्रेमातून सांगलीच्या अमृता देशपांडेची झालेली हत्या, तेवीस वर्षांनंतरही अंगावर शहारे आणणारी घटना

नागपुरात तरुणाची गळा चिरून हत्या, यशोधरा नगरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना