AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs CSK Toss : दिल्लीचा सीएसके विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, महेंद्रसिंह धोनीचं कमबॅक? जाणून घ्या

Delhi Capitals vs Chennai Super Kings Toss and Playing 11: दिल्ली कॅपिट्ल्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

DC vs CSK Toss : दिल्लीचा सीएसके विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, महेंद्रसिंह धोनीचं कमबॅक? जाणून घ्या
Ruturaj Gaikwad and Axar Patel DC vs CSK Toss IPL 2026Image Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 05, 2026 | 7:46 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 48 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन अक्षर पटेल याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि चेन्नई दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात अनुभवी आणि प्रमुख फलंदाज महेंद्रसिंह धोनी याचं कमबॅक झालंय की नाही? हे आपण जाणून घेऊयात.

चेन्नई आणि दिल्ली दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. चेन्नईकडून 2 बदल करण्यात आले आहेत. फिरकीपटू अकील हौसेन आणि गुरजनप्रीत सिंह या दोघांचं कमबॅक झालं आहे. तर महेंद्रसिंह धोनी याच्या कमबॅकची क्रिकेट चाहत्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कायल जेमीसन याच्या जागी लुंगी एन्गिडी याचं कमबॅक झालं आहे.

2026 मधील आकडेवारी

नवी दिल्लीतील या स्टेडियममध्ये 2026 वर्षात आतापर्यंत एकूण 4 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. या 4 पैकी एका सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर 3 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. त्यामुळे आता अक्षर पटेलचा पहिले बॅटिंगचा निर्णय किती योग्य ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यात 11 एप्रिलला आमनासामना झाला होता. तेव्हा चेन्नईने दिल्लीचा 23 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे दिल्ली या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पाथुम निसांका, करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, नितीश राणा, अक्षर पटेल (कॅप्टन), आशुतोष शर्मा, लुंगी एनगिडी, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि टी नटराजन.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि गुर्जपनीत सिंग.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं