AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs CSK : सामना पावसामुळे रद्द झाल्यास चेन्नई सुपर किंग्सचा पत्ता कट? असं असेल हवामान

Delhi Capitals vs Chennai Super Kings IPL 2026 Weather Report: दिल्ली कॅपिट्ल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 2 गुणांसाठी टफ फाईट पाहायला मिळणार आहे. मात्र त्याआधी 48 व्या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने दोन्ही संघांसह चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

DC vs CSK : सामना पावसामुळे रद्द झाल्यास चेन्नई सुपर किंग्सचा पत्ता कट? असं असेल हवामान
DC vs CSK IPL 2026 Weather ReportImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 05, 2026 | 6:19 PM
Share

आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम निर्णायक वळणावर आहे. प्रत्येक संघाने किमान 9 आणि जास्तीत जास्त 10 सामने खेळले आहेत. काही संघांनी दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे त्या संघांना प्लेऑफसाठी अवघ्या 2-3 विजयांची गरज आहे. तर काही संघांचा प्लेऑफसाठी संघर्ष सुरु आहे. इथून एक पराभवही प्लेऑफचं स्वप्न भंग करणारा ठरु शकतो. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 47 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. तर 48 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना पावसामुळे रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्ली विरुद्ध चेन्नई सामना

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स 5 मे रोजी आमनेसामने असणार आहेत. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना हवामानामुळे प्रभावित होऊ शकतो. हवामान विभागाने संध्याकाळी ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात संध्याकाळी 6 पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गारपिट होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, संध्याकाळी 7 नंतर पावसाची शक्यता नाही. मात्र त्याआधी पावसाची आणि गारपिटीची शक्यता कायम आहे. त्यामुळे सामन्याला विलंबाने सुरुवात होऊ शकते. तसेच सामना रद्द होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सामना पावसामुळे रद्द झाल्यास क्रिकेट चाहत्यांनी निराशा होऊ शकते. तसेच दोन्ही संघांसाठी सामना रद्द होणं हे नुकसानकारक ठरु शकतं.

दिल्ली आणि चेन्नईचा प्लेऑफसाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना रद्द होणं परवडणार नाही. त्यामुळे दोघांपैकी कोणत्या संघाला सामना रद्द झाल्यास सर्वाधिक फटका बसणार? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पॉइंट्स टेबलमधील स्थिती पाहता दोन्ही संघांना सामना रद्द झाल्यास इतका मोठा फटका बसणार नाही. मात्र त्यांच्या अडचणीत वाढ होणार इतकं मात्र निश्चित आहे.

दिल्ली आणि चेन्नईची कामगिरी

दरम्यान दिल्ली आणि चेन्नई या दोघांचा 5 मे रोजी होणारा आयपीएल 2026 स्पर्धेतील 10 वा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 9 पैकी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांच्या खात्यात 8-8 गुण आहेत. नेट रनरेटमुळे चेन्नई सहाव्या आणि दिल्ली सातव्या स्थानी आहे. उभयसंघातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 9-9 गुण होती. त्यानंतरही दोन्ही संघांचे प्रत्येकी 4-4 सामने शेष राहतात. त्यामुळे आता नवी दिल्लीतील सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?