लग्नसोहळ्यात भेट, विवाहितेसोबत लिव्ह-इन, महिला गरोदर होताच प्रियकर छूमंतर

| Updated on: Oct 10, 2021 | 2:40 PM

15 सप्टेंबर रोजी महिलेने एका मुलाला जन्म दिला. आता ती नवजात मुलाला घेऊन दारोदार भटकत आहे. लग्नाच्या आमिषाने आरोपी प्रियकराने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

लग्नसोहळ्यात भेट, विवाहितेसोबत लिव्ह-इन, महिला गरोदर होताच प्रियकर छूमंतर
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

जयपूर : राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात एक महिला तिच्या 25 दिवसांच्या नवजात अर्भकासह पोलिसांकडे दाखल करायला गेली. लग्नाच्या आमिषाने एका पुरुषाने आपल्याशी 5 वर्षे शारीरिक संबंध ठेवले. मात्र जेव्हा आपण गर्भवती राहिलो, तेव्हा प्रियकर सोडून पळून गेला, असा आरोप महिलेने लेखी तक्रारीत केला आहे.

काय आहे प्रकरण?

15 सप्टेंबर रोजी महिलेने एका मुलाला जन्म दिला. आता ती नवजात मुलाला घेऊन दारोदार भटकत आहे. लग्नाच्या आमिषाने आरोपी प्रियकराने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी तिने केली आहे. अजमेरच्या रामगंज पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

अजमेरच्या रामगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सतेंद्र सिंह नेगी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नेगी यांनी सांगितले की, चंद्रबरदाई नगरमध्ये राहणाऱ्या पीडितेची तक्रार प्राप्त झाली आहे. पीडितेने सांगितले की जून 2016 मध्ये अजमेरमधील एका लग्नात तिची भेट हरियाणातील रहिवासी अरुण चुगशी झाली.

लग्नाच्या आमिषानंतर लिव्ह इन

यानंतर दोघांमधील संपर्क वाढला. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. यानंतर अरुणने तिच्यासोबत राहण्याची ऑफर दिली. तक्रारीनुसार, महिलेने अरुणला सांगितले की, ती विवाहित आहे आणि तिच्या पतीपासून घटस्फोट घेतलेला नाही, परंतु ती विभक्त राहते. तिला एक मुलगीही आहे. आरोपी अरुणने मुलीला दत्तक घेऊन महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिले.

गरोदर राहिल्यानंतर प्रियकर परागंदा

तक्रारीत महिलेने सांगितले आहे की अरुणच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दोघेही पीडितेच्या घरी एकत्र राहू लागले. लग्नाच्या बहाण्याने अरुणने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. या वर्षी एप्रिलमध्ये तिने अरुणला गर्भवती असल्याची माहिती दिली. यानंतर आरोपी अरुण तिला सोडून गेला आणि नंतर तिच्याशी संपर्क साधला नाही.

यादरम्यान तिने अनेक वेळा त्याला फोनही केला, पण त्याने फोन उचलला नाही. 15 सप्टेंबर रोजी पीडितेने एका मुलाला जन्म दिला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा