AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात दिवसांवर लग्न, अपघातस्थळी बचावासाठी नवरदेव धावला, तिथेच भरधाव ट्रेलरने चिरडून अंत

अपघातानंतर टँकर चालक केबिनमध्ये अडकला होता. लोक त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी अहमदाबादकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने विनोदला चिरडले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

सात दिवसांवर लग्न, अपघातस्थळी बचावासाठी नवरदेव धावला, तिथेच भरधाव ट्रेलरने चिरडून अंत
अपघातात नवरदेवाचा मृत्यूImage Credit source: ट्विटर
| Updated on: May 19, 2022 | 3:52 PM
Share

उदयपूर : राजस्थानमध्ये उदयपूर जिल्ह्यातील (Udaipur Accident) टीडी पोलीस स्टेशन हद्दीतील उदयपूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर दुर्दैवी रस्ता अपघातात एका नवरदेवाचा मृत्यू (Groom Death) झाला. अपघातात बळी पडलेल्या तरुणाचे अवघ्या सात दिवसांनी लग्न होते. अपघाताच्या वृत्ताने लग्नघरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गाव दु:खात बुडाले आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह महामार्गावर ठेवून निदर्शने (Rajasthan Crime News) केली. नंतर त्यांची समजूत घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना तिथून हटवले. टीडीमधील बोरिकुआन येथे हा अपघात झाला.

अपघातस्थळी नवरदेव धावला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिकुआन-गोज्या गावातील रहिवासी विनोद मेघवाल याचे 25 मे रोजी लग्न होणार होते. घरात लग्नाच्या गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास विनोदही डीजेवर नाचत होता. यादरम्यान घरापासून काही अंतरावर गॅसचा टँकर उलटला. टँकर उलटल्याची माहिती मिळताच विनोदही मित्र आणि नातेवाईकांसह तिथे पोहोचला.

भरधाव ट्रेलरखाली चिरडून मृत्यू

अपघातानंतर टँकर चालक केबिनमध्ये अडकला होता. लोक त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी अहमदाबादकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने विनोदला चिरडले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. विनोदच्या मृत्यूवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. त्याच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच गावात शोककळा पसरली.

नातेवाईकांचा ठिय्या

अपघातानंतर विनोदचे नातेवाईक व ग्रामस्थ संतापले. त्यांनी मृतदेह महामार्गावर ठेवून आंदोलन छेडले. माहिती मिळताच टीडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त झालेले लोक शांत झाले नाहीत. नंतर पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने ग्रामस्थांना शांत केले. पोलिसांनी तिथून मृतदेह उचलून टीडी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेऊन शवविच्छेदन केले.

एकुलता एक मुलगा गेला

25 मे रोजी ऋषभदेव थापडावाडी येथील रहिवासी मनीषा हिच्याशी विनोदचा विवाह होणार होता. दोन्ही कुटुंबातील आनंदाचे वातावरण अपघातानंतर काही मिनिटांत शोकात रूपांतरित झाले. विनोद हा उदयपूरमधील एका खासगी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. त्यापैकी एक विवाहित आहे. विनोदचे वडील मजूर आहेत

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.