AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकानदारालाच माहित नाही त्याच्या नावावर 12 कोटींचं ट्रान्सेक्शन, IT विभागाची धाड पडली अन्… सर्वच झालेत थक्क!

सध्याच्या आधुनिक जगात तुमची कागदपत्रं व्यवस्थित जपून ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबत कोणी चुकीचा वापर तर करत नाही ना याची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण एका दुकानदाराला त्याचा जबर फटका बसला आहे.

दुकानदारालाच माहित नाही त्याच्या नावावर 12 कोटींचं ट्रान्सेक्शन, IT विभागाची धाड पडली अन्... सर्वच झालेत थक्क!
पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याला गंडा
| Updated on: Apr 06, 2023 | 6:20 PM
Share

जयपूर – राजस्थानच्या भिलवाडा भागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 12.23 कोटींचं ट्रान्सक्शन केल्याप्रकरणी दिव्यांग स्टेशनरी दुकानदाराला इनकम टॅक्सची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्या दुकानदाराने असं कोणतंच ट्रान्सक्शन केलं नव्हतं. त्यामुळे इनकम टॅक्स विभागाने नोटीस का पाठवली आहे? यामागचं कारणच त्याला कळेना. किशन गोपाल चपरवाल यांनी ती नोटीस वारंवार वाचली तेव्हा त्यांना कळलं की, ही नोटीस आपल्या नावानेच काढली गेलीआहे. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा पॅन कार्डचा कोणतरी चुकीचा वापर केला असल्याचं समोर आलं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, राजस्थानच्या भिलवाडा येथील संजयनगर येथे राहणाऱ्या 38 वर्षीय किशन गोपाल चपरवाल याने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितलं करी चार्टर्ड अकाउंटंटकडे गेलो तेव्हा त्याने सांगितलं की, पॅन कार्डचा चुकीचा वापर केला गेला आहे.मुंबई आणि सूरत येथील दोन डायमंड कंपन्यांनी चुकीचा वापर केला आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची देवाणघेवाण झाली आहे.

किशन चपरवाल याने दुकान सुरु करण्यासाठी लोन घेतलं होतं. पण अजूनही कर्जाचे हफ्ते फेडताना नाकी नऊ येतात. दर महिन्याला 8 ते 10 रुपयांची कमाई होते. त्यात घरखर्च आणि इतर खर्च वगळता हाती तसं काही राहात नाही. त्यामुळे इतक्या कोटींचा माझा काही संबंध नाही. बनावट कंपन्या स्थापन करून पॅनकार्डच्या माध्यमातून माझी फसवणूक केली आहे.

किशन गोपाल याला आयकर विभागाने नोटीस पाठवून ट्रान्सक्शनबाबत उत्तर मागितलं आहे. तसेच 12.23 कोटींच्या ट्रान्सक्शनप्रकरणी डिटेल्स सबमिट करण्यास सांगितलं आहे. पॅनकार्डचा वापर कोण करत आहे हे माहित नसल्याचं त्याने सांगितलं. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना शिक्षा करण्याची मागणी किशनने केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणी सुभाष नगर पोलीस तपास करत आहेत.

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.