AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणसं आहेत की हैवान ! तोंडात दगड, गमने चिकटलेले ओठ; 15 दिवसांच्या बाळाला जंगलात टाकलं आणि…

राजस्थानमधील भिलवाडा येथे, एका जंगलात दगडांनी वेढलेल्या भागत 10 ते 15 दिवसांचे नवजात बाळ सापडले. त्याची अवस्था खूपच वाईट होती. त्याच्या तोंडात दगड भरले होते आणि त्याचे ओठ फेविकॉलने चिकटवले होते. त्याची अवस्था पाहून कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे .

माणसं आहेत की हैवान ! तोंडात दगड, गमने चिकटलेले ओठ; 15 दिवसांच्या बाळाला जंगलात टाकलं आणि...
तोंडात दगड कोंबून, गमने ओठ चिकटवून बाळालं जंगलात टाकलं
| Updated on: Sep 24, 2025 | 12:59 PM
Share

माणसा माणसा कधी होशील माणूस ? असा प्रश्न विचारावा लागणं हेच माणूस म्हणवून घेणयाचं लक्षण नाही. राजस्थानच्या भिलवाडा परिसरात जे घडलंय, ते ऐकल्यावर माणूस म्हणून तुमचीही मान शरमेने खाली जाईल, हृदयाचा थरकाप उडेल आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. माणसांपेक्षा प्राणी बरे असंच म्हणावसं वाटेल. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील बिजोलिया उपविभागातील माल का खेडा रोडवरील सीताकुंडच्या जंगलात अवघं 10 ते 12 दिवसांचं नवजात बाळ सापडलं. कोणत्या तरी नराधमाने अवघ्या काही दिवसांचं ते बाळ दगडाखाली गाडून टाकलं होतं. जेव्हा त्या बाळाला बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्याची अवस्था इतकी वाईट, इतकी दयनीय होती की ते पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.

किंकाळ्या दाबण्यासाठी दगड टाकून तोंडाला लावला गम

त्या चिमुरड्या बाळाला भर जंगालत दगडात टाकून देणाऱ्या हैवानाची क्रूरता इतकी वाढली की, त्या बाळाचं रडणं, किंकाळ्या बाहेर पडू नयेत, आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडात एक दगड टाकून त्याचे ओठ फेवीक्विकने चिकटवून टाकण्यात आलं होत. पण म्हणतातत ना… देव तारी त्याला कोण मारी ! तसंच काहीस त्या निरागस बाळासोबत घडलं. बाळ जिथे पडलं होतं, त्या खडकांजवळच आपली गुरे चारणाऱ्या एका मेंढपाळाने मुलाच्या मंद रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्याने ताबडतोब गावकऱ्यांना कळवलं आणि वेळीच बाळाचा जीव वाचवला.

दगडाखालून येत होता आवाज

मंगळवारी दुपारी, बिजोलिया पोलिस स्टेशन परिसरातील सीताकुंड जंगलात एक मेंढपाळ आपली गुरे चारत होता. त्याला जवळच्या खडकांमधून बाळाच्या रडण्याचा मंद आवाज ऐकू आला. तो जवळ गेला तेव्हा त्याला खडकाखाली एक नवजात बाळ पडलेले दिसले. ते पाहून त्या मेंढपाळाने जवळच्या मंदिरात बसलेल्या गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी बिजोलिया पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि गावकऱ्यांच्या मदतीने चिमुरड्या बाळाला बाहेर काढले.

गरम दगडाने शरीर भाजलं

जेव्हा त्या बाळाला बाहेर काढण्यात आले तेव्हा असे अवस्था पाहून सगळ्यांच्या काळजात चर्र झालं. कारण त्या मुलाच्या तोंडात एक दगड ठेवून तोंड बंद करण्यात आलं होतं आणि वरून ते फेविक्विकने चिकटले होते. 108 च्या मदतीने पोलिसांनी मुलाला बिजोलिया रुग्णालयात दाखल केले, पण तिथे त्याची प्रकृती सुधारली नाही तेव्हा त्याला भिलवाडा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की आता बाळाची प्रकृती सुधारत आहे, परंतु गरम दगडामुळे त्याच्या शरीराचा डावा भाग भाजला होता. याप्रकरणी बिजोलिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून हे भयानक कृत्य करणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.