दुपारपर्यंत घरात शांतता, शेजाऱ्यांनी डोकावून पाहिलं, तर दोन चिमुकल्यांसह महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत

शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जेव्हा रसाल कंवरच्या घरातून कुठलीही हालचाल जाणवली नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

दुपारपर्यंत घरात शांतता, शेजाऱ्यांनी डोकावून पाहिलं, तर दोन चिमुकल्यांसह महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत
राजस्थानमध्ये महिलेची दोन मुलांसह आत्महत्या
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 1:09 PM

जयपूर : दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन महिलेने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थान राज्यातील बाडमेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलाचा जीव घेऊन विवाहितेने स्वतःचंही आयुष्य संपवलं. हुंड्याच्या दबावातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बहिणीने सामूहिक आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील वाकलपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. रसाल कंवर हिचा विवाह सात वर्षांपूर्वी माधव सिंहसोबत झाला होता. माधव ट्रक चालक आहे. माधव आणि रसाल यांना सहा वर्षांची जसू ही मुलगी आणि तीन वर्षांचा विक्रम हा मुलगा आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जेव्हा रसाल कंवरच्या घरातून कुठलीही हालचाल जाणवली नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रसाल आणि तिची दोन्ही मुलं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

पतीने हुंड्यासाठी छळल्याचा आरोप

शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. घटनेच्या वेळी तिघंच जण घरी होती. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. रसालच्या माहेरच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन गृहाजवळ एकच गर्दी केली. नवऱ्याने हुंड्यासाठी केलेल्या छळाला कंटाळूनच आपल्या बहिणीने टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप तिच्या भावाने केला आहे. शुक्रवारी रात्री आधी मुलांनी फासावर लटकवून महिलेने स्वतः गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

नऊ दिवसांपूर्वीच लग्न, माहेरी येऊन विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या

मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला