स्कायवॉकवर चढला माथेफिरू, अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्याने फिल्मी स्टाईलने केली सुटका

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील स्कायवर असलेल्या जाळीवर एक इसम अडकून पडल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

स्कायवॉकवर चढला माथेफिरू, अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्याने फिल्मी स्टाईलने केली सुटका
कल्याणमध्ये स्कायवॉकवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Nov 11, 2022 | 9:44 PM

कल्याण : आजवर कधी पाण्याच्या टाकीवरून तर कधी टेरेसवर अनेकजण कधी स्वतःहून अडकले आहेत तर काहींनी स्वतःचा जीव जाणूनबुजून धोक्यात घातल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्याणमधून अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे. स्कायवॉकच्या जाळीवर एक माणूस अडकून पडला होता. मात्र अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्याने फिल्मी स्टाईलने त्याची सुटका केली आहे.

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात घडली घटना

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील स्कायवर असलेल्या जाळीवर एक इसम अडकून पडल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या इसमाला पाहून स्टेशन परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याची माहिती पोलीसांना देण्यात आली.

अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत सुटका केली

घटनेची माहिती मिळताच सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलिसांनी केडीएमसीच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा इसम स्कायवॉकच्या बाहेरील बाजूस लटकत होता.

सदर इसम मनोरुग्ण असल्याची माहिती

एखाद्या चित्रपटाचा सिन वाटावा असाच हा प्रसंग होता. अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या इसमाची सुटका केली. हा इसम मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली असून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशाची बॅग लंपास

कल्याण रेल्वे स्थानकात पश्चिमेकडील बुकिंग हॉल येथे झोपलेल्या एका प्रवाशाची बॅग चोराने लंपास केल्याची घटना आज घडली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.