AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज चौघेही मरणार म्हणाला अन् काही वेळातच… फेसबुक लाईव्हमुळे उलगडले अपघाताचे रहस्य

कार चालवत असताना चौघे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मित्रांना भरधाव बीएमडब्लूचा रोमांचक प्रवास दाखवत होते.

आज चौघेही मरणार म्हणाला अन् काही वेळातच... फेसबुक लाईव्हमुळे उलगडले अपघाताचे रहस्य
बीएमडब्लूच्या अपघातात चौघांचा मृत्यूImage Credit source: Aaj Tak
| Updated on: Oct 17, 2022 | 7:07 PM
Share

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरमध्ये झालेल्या अपघाताबाबत अपघातात अनेक खुलासे झाले आहेत. बीएमडब्लू कारचा अपघात होऊन चौघांचा मृत्यू (Four Death in BMW Accident) झाला. भरधाव वेगातील बीएमडब्लू कार अनियंत्रित झाल्याने (Uncontrolled Car) हा अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातावेळी बीएमडब्लूचा वेग ताशी 230 किमी होता. अपघात होण्यापूर्वी कारमधील चौघांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) केले होते. यावेळी एक जण आज चौघेही मरणार असे बोलत आहे.

मयतांमध्ये डॉक्टरचा समावेश

डॉ. आनंद कुमार, इंजीनिअर दीपक आनंद, अखिलेश सिंह आणि भोला कुशवाहा अशी अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. चौघे जण बीएमडब्लू कारने लखनौ येथे चालले होते. सदर कार भोला कुशवाहा चालवत होता.

घटनेआधी चौघांनी फेसबुक लाईव्ह केले

कार चालवत असताना चौघे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मित्रांना भरधाव बीएमडब्लूचा रोमांचक प्रवास दाखवत होते. तसेच लाईव्हमध्ये चौघेही कारच्या स्पीडवर चर्चा करत आहेत.

फेसबुक लाईव्हमध्ये हे चौघे कारचा वेग आणखी वाढवण्यास बोलत आहेत. तसेच वेग वाढवत सीट बेल्ट लावण्यास सांगितले जात आहे. यादरम्यान भरधाव कार कंटनेवर धडकली आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात कारचा चक्काचूर

अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. तसेच एका तरुणाचे सर्व अवयव वेगळे झाले, असे प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितले. मयत डॉक्टर आनंद कुमार आणि इंजिनिअर दीपक आनंद एकमेकांचे मेव्हणे होते. तर अन्य दोघे डॉक्टरचे मित्र होते.

डॉक्टर आनंद कुमार हे एनएमसीएचमध्ये लेप्रोसी विभागात एचओडी होते. त्यांना महागड्या कार आणि बाईकचा शोक होता. त्यांच्याकडे 16 लाखाची बाईक आणि सव्वा कोटीची बीएमडब्लू होती. बीएमडब्लूच्या सर्विसिंगसाठी ते त्यांचे मेहुणे आणि दोन मित्रांसह लखनौला जात होते.

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.