सरपंचपदाच्या उमेदवाराला गाडीत बसवून लॉजवर नेले, धुळ्यात सिनेस्टाईल अपहरण

| Updated on: Feb 15, 2021 | 1:21 PM

धुळ्यातील साकवद ग्रामपंचायतीत ही घटना घडली. 11 फेब्रुवारीला शिरपूरच्या बाजारातून भरदिवसा या सदस्याचे अपहरण करण्यात आले.

सरपंचपदाच्या उमेदवाराला गाडीत बसवून लॉजवर नेले, धुळ्यात सिनेस्टाईल अपहरण
Dhule Sakwad Gram Panchayat
Follow us on

धुळे : सरपंच पदासाठी मतदान करु नये, म्हणून निवडणुकीच्या एक दिवस आधी नवनिर्वाचित सदस्याचे (Sakvad Grampanchayat Member Kidnapping) अपहरण करण्यात आलं. धुळ्यातील साकवद ग्रामपंचायतीत ही घटना घडली. 11 फेब्रुवारीला शिरपूरच्या बाजारातून भरदिवसा या सदस्याचे अपहरण करण्यात आले. तिसऱ्या दिवशी स्वत:ची सुटका करुन आल्यानंतर या सदस्याने पोलिसात तक्रार नोंदवली (Sakvad Grampanchayat Member Kidnapping).

नेमकं प्रकरण काय?

साकवद ग्रामपंचायतीत दोन्ही पॅनलचे प्रत्येकी 3 सदस्य निवडून आल्याने सरपंच आणि उपसरपंच पद कोणाकडे जाईल, अशी संभ्रमावस्था आहे. 12 फेब्रुवारीला सरपंचपदाची निवडणूक होती. 14 फेब्रुवारीला घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने 11 फेब्रुवारीला दत्तू धना भील हे पत्नी तोलाबाई, भाचा आणि चुलत भाऊ महादू भीलसह बाजार करण्यासाठी शिरपूरला आले.

भरदिवसा बाजारातून अपहरण

दुपारी 4 वाजेपर्यंत बाजार झाल्यावर अरुणावती नदीवरील खंडेराव मंदिराजवळ चारचाकीतून आलेल्या 3 अनोळखी संशयितांनी दत्तू भील यांना उचलून गाडीत बसवले. नंतर वेगाने गाडी खर्देमार्गे मुंबई-आग्रा हायवेवरुन पुन्हा मांडळ शिवारात असलेल्या रिक्रिएशन गार्डनमागे गाडी थांबवली. संशयितांच्या बोलण्यावरुन भील यांचं अपहरण झाल्याचे त्यांना समजले.

अपहरणकर्त्यांनी यादरम्यान 12 फेब्रुवारीला सहा वाजता भील यांना धुळ्यातील एका लॉजवर नेले. सकाळी पुन्हा 11 वाजता त्यांना गाडीत बसवून मालेगावला घेऊन गेले. तिथून पुन्हा धुळ्यामार्गे सायंकाळी 5 वाजता शिरपूर फाट्यावर गाडी थांबवली. काही वेळानंतर तेथून खंबाळे गावात घेऊन आले. तिथे विडी घेण्याच्या बहाण्याने भील यांनी नजर चुकवून तेथून पळ काढला.

खंबाळेच्या जंगलातून आंबे गावात पोहोचले. तेथे आत्तेभाऊ रोहिदास भील याला सर्व हकिगत सांगून त्याच्या मोबाईलवरुन पत्नी तोलाबाईला सुरक्षित असल्याचे कळवले (Sakvad Grampanchayat Member Kidnapping).

अपहरण झाल्यानंतर तोलाबाईने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेपत्ता असल्याची माहिती गावात रोहिदास भील यांच्या घरी देण्यात आली. लागलीच पोलीस दत्तू भील यांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी दत्तू भील यांच्या तक्रारीनुसार, संशयित भूषण मोरे (शिरपूर), लखन भील (शिरपूर), सुनील उर्फ भिवसन भील (शिरपूर) आणि अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Sakvad Grampanchayat Member Kidnapping

संबंधित बातम्या :

60 ग्रामपंचायतींवर आरपीआयच्या नेतृत्वात विजय तर 3 हजार उमेदवार विजयी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा

शंभूराज देसाईंच्या मेहनतीला यश, पाटण तालुक्यात 107 पैकी 68 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा