Satara Crime : ‘गाडी काढ लका’ असं म्हणताच कोयता काढला आणि डोक्यातच घातला! घटना साताऱ्यातली

Satara crime news : अटक करण्यात आलेल्या तरुणांची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जातेय. तर एकूण आठ जणांवर पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी गुन्हे नोंदवून घेतलेत

Satara Crime : 'गाडी काढ लका' असं म्हणताच कोयता काढला आणि डोक्यातच घातला! घटना साताऱ्यातली
kokan CrimeImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 11:54 AM

सातारा : छोट्याशा कारणावरुन वाद होणं, हे काही आता नवं राहिलेलं नाही. किरकोळ वादातून टोकाच्या घटना वाढत असल्यानं आता चिंता व्यक्त केला जातेय. साताऱ्यात (Satara News) अशीच एक घटना घडली. रस्त्यातील गाडी वाजूला काढायला सांगितलं, म्हणून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. जीवघेणा हल्ला (Attempt to murder) केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय. तिघांना अटकही केलीये. सध्या सातारा पोलीस (Satara crime News) याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. एकूण आठ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर अनेकदा किरकोळ कारणावरुन वाहन चालकांमध्ये वाद होत असतात. कधी हॉर्न वाजवल्यावरुन भांडण, कधी ओव्हरटेक केल्याचा राग, तर कधी कट मारल्याचं कारण…. वेगवेगळ्या कारणांवरुन याआधीही अनेक टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा साताऱ्यात घडलेल्या या घटनेनं रस्त्यावर होणाऱ्या वादाचं रुपांतर हत्येच्या प्रयत्नापर्यंत केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

तरुण मुलांना वाद भोवला..

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणी अटक करण्यात आलेली मुलं ही अवघी 20 ते 23 वर्षांची आहेत. अटक करण्यात आलेल्या मुलांची नावं खालीलप्रमाणे

हे सुद्धा वाचा
  • प्रथमेश बाळासाहेब जगताप, वय 20, राहणार वर्ये, तालुका सातार
  • आदर्श हणमंत रणखांबे, वय 21,राहणार मंगळापूर, तालुका कोरेगाव
  • अनिल रत्नदीप जाधव, वय 23, तांदुळवाडी, तालुका कोरेगाव

अटक करण्यात आलेल्या तरुणांची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जातेय. तर एकूण आठ जणांवर पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी गुन्हे नोंदवून घेतलेत. दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर साताऱ्यामधीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत वाद…

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील एक व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला होता. रस्त्यावर एका स्कॉर्पिओ चालकानं भरधाव वेगानं गाडी चालवत बाईकवाल्याला कट मारली होती. यात बाईकवाल्याला स्कॉर्पिओची धडक बसली होती. त्यानंतर स्कॉर्पिओ चालकानं पळ काढला होता. हिट एन्ड रन प्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी यानंतर केली जात होती.

ही घटना घडण्याआधी बाईक रायडर्स आणि स्कॉर्पिओ चालकांमध्येही बाचाबाची झाली होती. स्कॉर्पिओ चालक बेदरकारपणे वाहन चालवत होता. त्याला शिस्तीत गाडी चालवण्यास बाईक रायडर्सच्या ग्रूपने सांगितलं होतं. पण त्यानंतर झालेल्या बाचाबाचीचा परिणाम हिट एन्ड रनमध्ये झाल्याचं दिसून आलं. यात एका बाईक रायडरला प्रचंड खरचटलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातही भर रस्त्यात जीवघेणा प्रकार उघडकीस आल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.