AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये हार्टअटॅक ने मृत्यू दाखवला आणि…, डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, मराठी अभिनेत्याची लक्षवेधी पोस्ट

साताऱ्यामधील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे... मराठी अभिनेत्याने यावर पोस्ट करत आपला यू.पी. बिहार झाला ! असं वक्तव्य केलं आहे.

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये हार्टअटॅक ने मृत्यू दाखवला आणि..., डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, मराठी अभिनेत्याची लक्षवेधी पोस्ट
फाईल फोटो
| Updated on: Oct 29, 2025 | 2:55 PM
Share

महाराष्ट्रात सध्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर खळबळ माजली आहे… हातावर सुसाईट नोट लिहित महिला डॉक्टरने स्वतःला संपवलं आहेत. याप्रकरणी सध्या पोलिसांची चौकशी सुरु असून रोज नवीन खुलासे होत आहेत. ज्यामुळे एक वेगळ चित्र समोर येत आहे… धक्कादायक गोष्ट म्हणजे, राजकीय नेते आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांत्या दबावामुळे डॉक्टर महिलेने टोकाचं पाऊन उचललं असं देखील सांगितलं जात आहे. याप्रकऱणी अनेक सेलिब्रिटींनी देखील मत व्यक्त केलं. तर अभिनेते किरण माने यांनी आपला यू.पी. बिहार झाला ! असं वक्तव्य करत धक्कादायक खुलासे करत आहेत…

फेसबूकवर पोस्ट करत किरण माने यांनी महिला डॉक्टर यांच्या आत्महत्ये प्रकरणी वक्तव्य केलं. डॉ. संपदा हत्या/आत्महत्या प्रकरणाची चर्चा करताना एक मुद्दा सतत चर्चेत येतोय की, “तिच्यावर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बदल करण्यासाठी माजी खासदार आणि पोलिसांकडून दबाव येत होता !” किती गंभीर आहे हे !!!

पोस्टमार्टेम ! माणसाच्या मृत्यूचं नेमकं कारण कळतं ते पोस्टमार्टम मुळेच. पोस्टमार्टेम मध्ये जे सांगितले जाते त्यावर आपण विश्वास ठेवतो. माणसाच्या हत्या प्रकरणात या रिपोर्टमुळे गुन्हेगारापर्यंत पोहोचणं सोपं जातं. यात असा भ्रष्टाचार चालतो… तो ही आपल्या राज्यात-आपल्या सातारा जिल्ह्यात… हे पाहून डोकं सुन्न होतं.

हे एक प्रकरण उघडकीला आलंय. म्हणजे असे किती ठिकाणी किती रिपोर्ट्स बदलून हे राजकारणी लोक किती खून पचवत असतील विचार करा. सत्ताधारी आणि पोलीसांच्या मदतीशिवाय हे शक्यच नाही.

पूर्वी यू.पी. बिहार मध्ये असे प्रकार ऐकले होते. आपल्या साताऱ्यात हा भ्रष्ट आणि घृणास्पद कारभार सुरू आहे म्हणजे शंभर टक्के खात्री पटली की आपला यू.पी. बिहार झाला !

उत्तर प्रदेशातल्याच संभल गांवांत मन मानेल तसा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्याचा प्रकार यापूर्वीच उघडकीला आलाय. ‘ऑनर किलिंग’ सारख्या गंभीर गुन्ह्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट फक्त ५०००० रुपयांत बदलले गेल्याचे उघडकीला आले होते.

अलीगढजवळ एटा गांवात तर पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हेराफेरी करून हत्येची आत्महत्या आणि आत्महत्येची हत्या दाखवणारे रॅकेटच सापडले होते. पंधरा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात भाजपाचा कार्यकर्ता सीताराम उपाध्यायला पोलिसांनी जबरी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ‘पोलिसांनी पोस्टमार्टेम रिपोर्ट मध्ये हार्टअटॅक ने मृत्यू दाखवून हा खून पचवला.’ असा त्याच्या भावाने आरोप केला…उपाध्यायचा भाऊ म्हणाला, ‘आमची भक्तीची नशा उतरली.’

खोटे पोस्टमार्टम रिपोर्टसाठी दबाव आणण्याचा आरोप असलेल्या फलटणच्या माजी खासदारानं जीवघेणा त्रास दिल्याचा आरोप एका भाजपाच्या कार्यकर्तीनं काल केला आहे. पण हल्ली अशा गुन्हेगारांना ‘तपासाचं पोस्टमार्टेम’ होण्याआधी क्लीन चीट देणारे चीटर जोमात आहेत.

तुम्ही सत्ताधाऱ्यांचे विरोधक असा किंवा अंधभक्त असा… या अराजकात सगळे एकसाथ भरडले जाणार आहात, हे मेंदूत कोरून ठेवा. तुम्ही कुठल्याही बाजूचे, कुठल्याही जातीचे-धर्माचे असा… तुमच्या पुढच्या पिढ्या धोक्यात आहेत. जागे व्हा. देश वाचवा… अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.