AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Drugs Case | युवा बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनच्या ‘नशा-पाण्याच्या’ गप्पा, NCB च्या हाती चॅटिंग

आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनडीपीएसचे विशेष न्यायालय आज (बुधवारी 20 ऑक्टोबर) निकाल देणार आहे. आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी जामीन अर्जावर आपला आदेश राखून ठेवला होता.

Aryan Khan Drugs Case | युवा बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनच्या 'नशा-पाण्याच्या' गप्पा, NCB च्या हाती चॅटिंग
Aryan Khan
| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 11:31 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामिनावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज (Mumbai Goa Cruise Drugs Party) प्रकरणात अडकलेल्या आर्यनचा जामीन अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलला जात होता. 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात न्यायाधीशांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे आज याचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनडीपीएसचे विशेष न्यायालय आज (बुधवारी 20 ऑक्टोबर) निकाल देणार आहे. आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी जामीन अर्जावर आपला आदेश राखून ठेवला होता.

उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीसोबत नशेबद्दल चॅटिंग

दरम्यान, क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानचे एका उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झालेले चॅटिंग देखील एनसीबीच्या हाती लागल्याची माहिती ‘आज तक’ने दिली आहे. गप्पांमध्ये नशेबद्दल चर्चा झाल्याची माहिती. एनसीबी टीमने न्यायालयाला दिलेल्या आरोपींच्या चॅटमध्ये आर्यनसोबत या अभिनेत्रीच्या गप्पांचाही समावेश आहे. याशिवाय, काही ड्रग पेडलरशी झालेल्या आर्यनच्या गप्पाही न्यायालयाच्या हाती लागल्या आहेत.

आर्यन खानचा मुक्काम कोठडीत कसा वाढत गेला ?

2 ऑक्टोबर- आर्यन खानला अटक, एक दिवसाची कोठडी

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना अटक करण्यात आले. यामध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मॉडेल मूनमून धमेचा यांचा समावेश होता. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती.

4 ऑक्टोबर- तीन दिवसांची एनसीबी कोठडी

एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर आर्यन खान तसेच त्याच्या इतर साथीदारांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. या कालावधीत एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली होती.

 7 ऑक्टोबर- 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

तीन दिवसांची एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयाने आर्यन खानसह इतर सात आरोपींना  7 ऑक्टोबर रोजी तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली होती. आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली होती. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला होता.

14 ऑक्टोबर- न्यायालयाने निकाल राखून ठेवला

आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी आर्यन खान, मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना एनडीपीएस मुंबई कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

संबंधित बातम्या :

Video: जुते दो, पैसे लो म्हणत, मेव्हणीची दाजींकडे चक्क 21 लाखांची मागणी, पाहा लग्नातील भन्नाट किस्सा

Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार अमिषा पटेल-सनी देओलची जोडी, लवकर होणार मोठी घोषणा!

‘Money Heist Season 5’च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित, प्रोफेसरच्या खेळीवर खिळल्यात सर्वांच्या नजरा!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.