AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशश्री शिंदेच्या हत्येनंतर राज ठाकरे यांच्या पत्नीचा प्रचंड संताप, पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर शर्मिला ठाकरे म्हणाल्या…

याच वर्षी शक्ती कायदा पास करावा, अशी पंतप्रधानांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे", असे शर्मिला ठाकरेंनी यावेळी म्हटले.

यशश्री शिंदेच्या हत्येनंतर राज ठाकरे यांच्या पत्नीचा प्रचंड संताप, पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर शर्मिला ठाकरे म्हणाल्या...
| Updated on: Jul 30, 2024 | 1:17 PM
Share

Sharmila Thackeray on Yashshree Shinde murder case : नवी मुंबईतील उरणमध्ये झालेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 20 वर्षाच्या यशश्री शिंदे या तरुणीची दाऊद शेख याने निर्घृण हत्या केली. यानतंर तिचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या झुडुपात फेकला. अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती. मृतदेहावर सर्वत्र रक्त होतं. शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊदच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथे मुसक्या आवळल्या. आता याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

शर्मिला ठाकरे यांनी यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी नुकतंच नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “आता तरी शक्ती कायद्याला मंजुरी द्यावी, अशी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे”, अशी मागणी शर्मिला ठाकरेंनी केली आहे.

“मुलींच्या रक्षणाची जबाबदारी तुमची”

“दहा वर्ष झाल्यानंतर शक्ती कायदा अमलांत आणला नाही, या वर्षी हा कायदा पास करा. दोन महिन्यात आरोपीला फाशी झालीच पाहिजे. कोणताही आरोपीला सुटला नाही पाहिजे. पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. सर्व मुलींच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आहे. कोणताच पक्ष तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा”, असे शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाले.

“याच वर्षी शक्ती कायदा पास करावा”

“गेल्या तीन दिवसांत तीन मुलींची… किती हिंस्त्रपणा. निर्भया प्रकरणात १६ वर्षांचा मुलगा सुटला हे चूकच आहे. ज्या मुलांमध्ये विकृती आहे, त्यांना फाशी द्या. या लोकांवर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे. पोलीस काय करु शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे. ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत. त्यामुळे याच वर्षी शक्ती कायदा पास करावा, अशी पंतप्रधानांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे”, असे शर्मिला ठाकरेंनी यावेळी म्हटले.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?